मुंबई, 9 मे : आजकाल अभिनेता अक्षय कुमारची नागरिकता हा देशभरातील चर्चेचा मुद्दा आहे. अक्षय कुमारचं भारतीय नागरिकत्व सध्या त्याच्या चाहत्यांसाठी एक कोडं बनलं आहे. नेहमीच देशभक्तीवर आधरित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अक्षय कुमार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यानं सध्या भारतातील राजकीय विषय बनला आहे. सुरुवातीला सहज वाटत असलेला मुद्दा आता दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयला मतदान न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला मात्र त्यानं त्या पत्रकाराला सरळ सरळ टाळलं. त्यानंतर त्यानं सोशल मीडियाद्वारे या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं. ज्यात त्यानं आपण मागच्या 7 वर्षांपासून कॅनडाला गेलेलो नाही असं म्हटलं होतं मात्र आता एक ट्विटर युजरनं अक्षयला खोटं ठरवत तो ५ वर्षांपूर्वीच टोरँटोमध्ये गेला असल्याच म्हटलं आहे. अक्षय कुमारनं त्याच्या नागरिकत्वावर सतत उठत असलेल्या प्रश्नांबाबत नुकतंच ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलं होतं. ज्यात त्यानं, त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे मात्र मागच्या 7 वर्षांपासून तो कॅनडाला गेलेला नाही. तो भारतातच राहतो आणि इथेच टॅक्स भरतो. असं लिहिलं होतं. यानंतर एका युजरनं काही स्क्रिनशॉट शेअर करत अक्षय खोट बोलत असून तो 5 वर्षांपूर्वीच टोरँटो येथे गेल्याचं म्हटलं आहे. अक्षय कुमारच्या 7 वर्ष कॅनडाला न गेल्याच्या त्या विधानाला खोटं ठरवत या ट्विटर युजरनं काही पोस्टचे स्क्रिनशॉट शेअर करत अक्षय 5 वर्षांपूर्वीच कॅनडाला गेल्याचं सांगितलं आहे. यामध्ये एक स्क्रिनशॉट बॉलिवूड सिंगर मीका सिंगचाही आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘शुभ सकाळ, अक्षय कुमार, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, राहुल खन्ना आणि किशोर लुला यांच्यासोबत टोरँटोमध्ये एक पार्टी एंजॉय केली.’
या युजरनं शेअर केलेले हे फोटो सगळीकडेच खूप व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता अक्षय कुमार जर 7 वर्ष कॅनडाला गेला नाही तर मग हे फोटो काय म्हणत आहेत. तसेच असं असेल तर मग अक्षय कुमार सर्वांशी खोटं बोलत आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी अक्षयनं त्याच्यावर होत असलेल्या टीकेवर सोशल मीडियावर आपलं मत मांडलं होतं. अक्षय कुमार म्हणाला, माझ्या नागरिकत्वाच्या मुद्याबद्दल लोक का उलट सुलट चर्चा करताहेत हेच कळत नाही. कॅनडाचा पासपोर्ट असला तरी मी ती गोष्ट कधीच लपविलेली नाही आणि गेली सात वर्ष कधीच कॅनडाला गेलेलो नाही. मी इथेच काम करतो आणि सर्व करही भरतो. माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा हा तांत्रिक आहे. लोकांनी त्यात लक्ष घालायला नको. नकारात्मक गोष्टींविषयी लोक जास्त चर्चा करतात असंही त्याने सांगितलं.
Akshay Kumar: While all these years, I have never needed to prove my love for India to anyone, I find it disappointing that my citizenship issue is constantly dragged into needless controversy, a matter that is personal, legal, non-political, and of no consequence to others. https://t.co/gGozmXd09Y
— ANI (@ANI) May 3, 2019