मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया- रणबीर पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यास; कपड्यांवरून झाले ट्रोल

आलिया- रणबीर पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यास; कपड्यांवरून झाले ट्रोल

आलिया भट्ट (Alia Bhatt)   आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यासाठी. कपड्यावरून करावा लागल ट्रोलिंगचा सामना.

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यासाठी. कपड्यावरून करावा लागल ट्रोलिंगचा सामना.

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यासाठी. कपड्यावरून करावा लागल ट्रोलिंगचा सामना.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 7 नोव्हेंबर- आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. लग्नाआधीच आलियाने रणबीरच्या कुटुंबासोबत चांगलीच मिक्स झाली आहे. आलिया अनेक कार्यक्रमात नीतू कपूर आणि रिद्धिमासोबत (Riddhima Kapoor Sahini) हजेरी लावत असते. आलिया कपूर कुटुंबासोबत बऱ्याचवेळा एकत्र पार्टी किंवा फॅमिली लंचमध्ये क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. आलियाला पुन्हा एकदा रणबीर कपूर आणि नीतू कपूरसोबत नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी स्पॉट करण्यात आलं.

आलिया भट्टसोबत रणबीरची आई नीतू कपूरही (Neetu Kapoor) होती. यावेळी रणबीर बांधकामाच्या जागेची पाहणी करताना दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आलिया यापूर्वी अनेकदा रणबीर कपूर आणि नीतू कपूरसोबत या नवीन घराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसली आहे. रविवारी, 7 नोव्हेंबरला सकाळी या तिघांनी पाली हिल येथील नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली.

आलिया यावेळी लोकांशी घराबद्दल बोलताना दिसली. नीतू कपूरही या संवादात सामिल झाल्याच्या दिसल्या. यादरम्यान, आलिया केस बांधताना दिसली. ज्याबद्दल एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ही तर आमच्यासारखे केस बांधते. तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'ओव्हर अॅक्टिंगचं दुकानं.' तिसरा युजर ड्रेस बघून म्हणतो, 'स्वतः काय रंगवत होता का?' लग्नानंतर आलिया आणि रणबीर या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आलियाने काळ्या रंगाचा ड्रेस व त्यावर चष्मा घातला आहे. यासोबतच पांढरे शूज घातले आहे. तर रणबीर कपूर निळ्या जीन्स आणि क्रीम टी-शर्टमध्ये दिसत आहे. नीतू कपूर हलक्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इस्टावर शेअर केला आहे, ज्यावर साडेतीन लाखांहून अधिक व्ह्यूज आल्या आहेत.

वाचा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जेठालालच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन; फॅमिली फोटो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्याने वेडिंग डेस्टिनेशनही निवडले आहे. त्यांना इटलीमध्ये लग्न करायचे आहे, परंतु अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आलिया आणि रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor