मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: आलिया भट्टने बनवला खास शरारा ड्रेस; बाळासाठी लिहलाय अनोखा मेसेज

VIDEO: आलिया भट्टने बनवला खास शरारा ड्रेस; बाळासाठी लिहलाय अनोखा मेसेज

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आलिया भट्ट आणि रणबीर कपूर तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आलिया भट्ट आणि रणबीर कपूर तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आलिया भट्ट आणि रणबीर कपूर तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 3  सप्टेंबर-   बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आलिया भट्ट आणि रणबीर कपूर तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतंच आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्रच्या प्रमोशन इव्हेन्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आलियाने जबरदस्त गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केला होता. आता आलिया भट्ट तिच्या या लुकमुळे चर्चेत आली आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आईबाबा बनणार आहेत. त्यामुळे आलियाने या ड्रेसवर एक खास मेसेज लिहला होता. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स आणि आता पतीपत्नी असलेल्या आलिया रणबीरला पहिल्यांदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूरआपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचले होते. या कार्यक्रमात नागार्जुन, करण जोहर, जूनियर एनटीआर, एसएस राजामौली आणि मौनी रॉयदेखील उपस्थित होते. यावेळी आलियाने आपल्या ड्रेस आणि लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कार्यक्रमादरम्यान आलियाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये 'बेबी ऑन बोर्ड' आणि 'लव्ह-लव्ह' असा खास संदेश लिहलेला होता. आलियाची ही स्टाईल काहींना आवडली, तर काहींनी नापसंतीही दर्शवली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया गुलाबी रंगाच्या शरारा ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने आपले केस खुले सोडले होते. अभिनेत्रीने अगदी कमी मेकअप लुक कॅरी केला होता. या संपूर्ण इव्हेंटमध्ये रणबीर आपल्या गर्भवती पत्नीची पूर्ण काळजी घेताना दिसला. आलियाच्या प्रेग्नेंसी लुकचं कौतुक करत एका चाहत्याने लिहलंय, 'ती प्रेग्नेंसीमध्ये आणखी सुंदर दिसत आहे.' दुसऱ्या एकाने लिहलंय - 'आउटफिट अप्रतिम दिसत आहे.' या व्हिडीओवर अशा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

(हे वाचा:Seema Sajdeh: सोहेल खानच्या X-पत्नीला मुलं नव्हे तर मुलींमध्ये इंट्रेस्ट, सीमाने केला मोठा खुलासा )

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी नाराजीही व्यक्त केली आहे. काहींनी रणबीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे 'बॉयकॉट ब्रह्मास्त्र'वरही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहलंय- 'लोकांच्या बोलण्याने आलियाला काय फरक पडतो. तिने आधीच सांगितलं आहे की, जर तुम्हाला मी आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका'.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor