जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पाहा अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं

VIDEO: वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पाहा अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं

VIDEO: वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पाहा अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं

नुकतंच वरुण धवन आणि समंथा मुंबईमध्ये एकत्र दिसून आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,12 मार्च- बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  सध्या अनेक साऊथ  (South Stars)  कलाकारांची एन्ट्री होत आहे. त्यामुळे बरेच साऊथ कलाकार बॉलिवूड कलाकरांसोबत दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan)  नॅशनल क्रश समजली जाणारी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदनासोबत (Rashmika Mandanna)   डान्स करताना दिसून आला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान आता वरुण धवन आणखी एका साऊथ सुंदरी सोबत दिसून आला. ही साऊथ सुंदरी दुसरी कुणी नसून समंथा प्रभू (Samantha Prabhu)  आहे. नुकतंच या दोघांना पापाराझींनी आपल्या कॅमेरात कैद केलं आहे. यावेळी वरुण समंथाची अशी काळजी घेताना दिसून आला. मनोरंजन सृष्टीतील कलाकारांचे व्हिडीओ असो किंवा फोटो समोर येताच, तुफान व्हायरल होऊ लागतात. असंच काहीसं झालंय वरुण धवन आणि समंथा प्रभूसोबत. नुकतंच या दोघांना मुंबईतील अंधेरी या ठिकाणी एकत्र पाहण्यात आलं. त्यांच्यासोबत दिग्दर्शक राज निदिमोरूसुद्धा होते. त्यांना पाहताच पापाराझींनी त्यांना घेरलं आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी बघता-बघता प्रचंड गर्दी जमली. त्यामुळे समंथा थोडी अस्वस्थ झाली. यावेळी वरुणने परिस्थिती हाताळण्यासाठी थोडी मजामस्तीदेखील केली. शिवाय वरुणने समंथाला सावरत तिच्या कारपर्यंत तिला पोहोचवलं.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओमध्ये वरुण धवन पापाराझींना मजेशीररित्या म्हणताना दिसत आहे, ‘‘अरे तुम्ही लोक घाबरऊ नका, कशाला घाबरवताय तिला’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये समंथा ग्रे-ब्लू कलरच्या जॅकेटमध्ये तर वरुण ऑरेंज कलरच्या टी-शर्टमध्ये दिसून येत आहे. वरुणच्या मजेशीर संवादावर समंथा हसू लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे. (हे वाचा: पुष्पा’ नंतर समंथाचा भाव वाढला, आगामी चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके कोटी ) वरुण धवन, समंथा प्रभू आणि राज निदीमोरू यांना एकत्र पाहून चाहते अंदाज लावत आहेत की हे दोघेही लवकरच एखादा चित्रपट किंवा सीरिज करण्याच्या तयारीत आहेत. कारण गेल्या वर्षी अशी बातमी आली होती की दोघेही अॅमेझॉन प्राइमच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात वरुण आणि समंथा यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात