मुंबई, 14 एप्रिल : अखेर आज रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं (Alia Ranbir Wedding) लग्न पार पडलं. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आज त्यांचं लग्न पार पडल्यानंतर चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. काही वेळांपूर्वी आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न पार पडलं. यानंतर आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची सद्या सगळीकडे चर्चा आहे. आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (A****lia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. हे ही वाचा- स्वतः च्या लग्नात आलिया भट्टसाठी फक्त बर्गर, पण रणबीरसाठी ‘ही’ खास डिश या लग्नाला काही बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरची एक झलक पाहण्यासठी उत्सुक होते. आता या दोघांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. आलियानं तिच्या इन्स्टाला लग्नाचे फोटो शेअर केले आहोेत. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. दोघांच्यावर चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लग्न झाल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना रणबीरने आपली राणी आलियाला उचलून घेतल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अनपेक्षितपणे त्याने आलियाला उचलून घेतलं.
यानंतर सर्वत्र एकच आवाज येत होता. त्यांच्या चाहत्यांनी मनापासून दोघांच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

)







