स्क्रीनवर फिट दिसणाऱ्या बिग बी यांचं लीव्हर 75 टक्के खराब, TB शी झुंज सुरू

स्क्रीनवर फिट दिसणाऱ्या बिग बी यांचं लीव्हर 75 टक्के खराब, TB शी झुंज सुरू

टीव्ही स्क्रीनवर सदाबहार, फिट आणि दिलखुलास दिसत असणाऱ्या बिग बी यांना खरं तर आरोग्याच्या आघाडीवर अनेक त्रासांना तोंड द्यावं लागत आहे. स्वतः अमिताभनीच आपल्या फिटनेसबद्दल धक्कादायक माहिती एका कार्यक्रमात दिली.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : बिग बी अमिताभ बच्चन amithabh bachchan यांनी 'कौन बनेका करोडपती'मधून Kaun Banega Crorepati  सोमवारीच शानदार पुनरागमन केलं. टीव्ही स्क्रीनवर सदाबहार, फिट आणि दिलखुलास दिसत असणाऱ्या बिग बी यांना खरं तर आरोग्याच्या आघाडीवर अनेक त्रासांना तोंड द्यावं लागत आहे. स्वतः अमिताभनीच आपल्या फिटनेसबद्दल धक्कादायक माहिती एका कार्यक्रमात दिली.

आपलं 75 टक्के लीव्हर खराब झालेलं आहे. फक्त 25 टक्के लीव्हरवर शरीर काम करतंय. शिवाय क्षयासारख्या (टीबी)आजाराशी आपण दोन हात करत आहोत, असं अमिताभ बच्चन म्हणाले. 76 वर्षीय अमिताभ बच्चन एका आरोग्यविषयक कार्यक्रमात सहभागी झाले होते. टीव्हीवरच्या या कार्यक्रमात ते म्हणाले, "आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. रेग्युलर चेकअप करत राहायला हवं. मला स्वतःला ट्यूबरक्युलॉसिस आणि इतरही काही आजार आहेत. पण योग्य चाचण्या झाल्या, तर याचा पत्ता लागतो आणि इलाज करणं शक्य होतं."

हेही वाचा : अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

आरोग्याच्या या कुरबुरींना तुमच्यावर कुरघोडी करू देता कामा नये, असा सल्लाही अमिताभ यांनी या वेळी दिला. अमिताभ आपल्या आरोग्याची काळजी घेतात. फिटनेससाठी दररोज ठरलेला व्यायाम करतात आणि न चुकता चालायला जातात. दिवसभर आपल्या कामात व्यग्र असले तरी आरोग्याच्या बाबतीत चालढकल करत नाही, कायम सतर्क असतो, असं ते म्हणाले.

संबंधित : 'इतिहास हमसे लिखा जाएगा...' Sye Raa Narasimha Reddy अमिताभच्या नव्या सिनेमाचं टीजर

अमिताभ यांनी आपल्या या आजारांबाबत खुलासा केला असला, तरी ते या वयातही खूप अॅक्टिव्ह आहेत. टीव्हीवर पुन्हा सुरू झालेला KBC चा नवा सीझन ते जोषात सादर करत आहेत. याशिवाय त्यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा लवकरच रीलिज होणार आहे. गुलाबो सिताबो नावाच्या त्यांच्या नव्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. 'सई रा नरसिम्हा रेड्डी'  सिनेमासुद्धा काही महिन्यातच येणार आहे. या सिनेमाचं टीजर आजच रीलिज झालं.

-------------

आता तर कहर झाला, सलाईनमध्ये आढळले किडे, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या