Sacred Games-2 मुळे उडाली यूएईतल्या 'या' व्यक्तीची झोप, वाचा कारण

Sacred Games-2 मुळे उडाली यूएईतल्या 'या' व्यक्तीची झोप, वाचा कारण

Sacred Games-2 रिलीज झाल्यानंतर युएईच्या ‘शारजाह’मध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीची अक्षरशः झोप उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला. त्यानंतर बघावं तिथे या सीझनची चर्चा दिसून येत आहे. पहिला सीझन तुफान गाजल्यानंतर मागच्या बऱ्याच काळापासून या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची खूपच चर्चा सुरू होती. मात्र हा सीझन रिलीज झाल्यानंतर ‘शारजाह’मध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीची अक्षरशः झोप उडाली आहे. या व्यक्तीला रात्र अपरात्री असंख्य अनोळखी नंबरवरून कॉल येत आहेत. ज्यामुळे या व्यक्तीला प्रचंड मनस्ताप सहान करावा लागत आहे.

युएईच्या शारजाहमधील एका तेल कंपनीमध्ये काम करणारे कुन्हाब्दुल्ला सीएम हे मूळचे केरळमधील रहिवासी आहेत. 15 ऑगस्टला रिलीज झालेल्या सेक्रेड गेम्स 2 च्या पहिल्या एपिसोडमध्ये कुन्हाब्दुल्ला सीएम यांचा नंबर काल्पनिक गँगस्टर सुलेमान ईसाचा नंबर आहे असं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर कुन्हाब्दुल्ला सीएम यांना जगभरातून असंख्य निनावी फोन कॉल्स येण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी एक सिनेमामध्ये दिल्लीतील एका युवकाचा नंबक सनी लिओनीचा नंबर म्हणून दाखवण्यात आला होता. ज्यामुळे त्या युवकाला खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आता कुन्हाब्दुल्ला सीएम यांच्यासोबतही काहीसा असाच किस्सा घडताना दिसत आहे.

(वाचा : 'इतिहास हमसे लिखा जाएगा...' एकदा Sye Raa Narasimha Reddy चा टीझर पाहाच)

जगभरातून येत आहेत फोन कॉल्स

कुन्हाब्दुल्ला यांनी गल्फ न्यूजला सांगितल्याप्रमाणे, भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि युएई आणि जगभरातल्या अनेक ठिकाणांहून त्यांना सतत फोन कॉल्स येत आहेत आणि त्यांना हेही समजत नाही आहे की, त्यांच्यासोबत काय होत आहे. ते सांगतात, मी फोनची रिंग सतत वाजत असल्यानं खूपच वैतागलो आहे. मला माझा हा नंबर बंद करायचा आहे. मला वाटतं असं केल्यानं ही समस्या सुटेल.

सेक्रेड गेम्सचा नावही ऐकलेलं नाही

कुन्हाब्दुल्ला यांनी नेटफ्लिक्सची वेबसीरिज सेक्रेड गेम्सचं नावही कधी ऐकलेलं नाही. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. कुन्हाब्दुल्ला यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी म्हटलं, सेक्रेड गेम्स काय आहे? हा कोणता व्हिडिओ गेम आहे का? मी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करतो. माझ्याकडे अशाप्रकारच्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही.

(वाचा : Sacred Games 2 अहं ब्रह्मास्मी! या ठिकाणी आहे गुरुजींचं आश्रम, तुम्हीही जाऊ शकता)

एका दिवसात आले 30 फोन

कुन्हाब्दुल्ला सीएम सांगतात, मला  रविवारी 30 पेक्षा जास्त फो कॉल्स आले. ज्यामुळे माझ्या फोनची बॅटरी संपत आहे. मागच्या 1 तासात मला 5 कॉल्स आले. ज्यावर ईसा नावाच्या व्यक्तीबद्दल विचारण्यात आलं. ही व्यक्ती कोण आहे, काय करते मला काहीही माहीत नाही आणि मला त्याच्याशी काही देणं घेणंही नाही.

(वाचा: सलमानच्या 'दबंग-3' मधून डेब्यू करणार अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया?)

कुन्हाब्दुल्ला सीएम यांचा हा नंबर सेक्रेड गेम्समधील त्या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे. ज्यात एक भारतीय एजंट गणेश गायतोंडेला एक गँगस्टर ईसाचा फोन नंबर असलेली चिठ्ठी देतो. नेटफ्लिक्सनं यावर  आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं, तुम्हला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. जसं आम्हाला याबद्दल समजलं त्यानंतर आम्ही या सीनच्या सब टायटलमधून तो नंबर काढून टाकला आहे.

==================================================================

SPECIAL REPORT : पुण्याची पैशाची 'खाण', तब्बल 300 कोटींचा घोटाळा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 10:00 AM IST

ताज्या बातम्या