मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt: 'मी 100 वर्षांची होईपर्यंत काम करेन'; आलियाचा वर्क लाईफ फंडा चर्चेत

Alia Bhatt: 'मी 100 वर्षांची होईपर्यंत काम करेन'; आलियाचा वर्क लाईफ फंडा चर्चेत

आलिया भट्ट सध्या आई होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि ते ती पूर्णपणे एन्जॉय करताना दिसत आहे.. सध्या तिच्या आयुष्यात आणि मुख्यतः वर्क फ्रंटवर ती जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे.

आलिया भट्ट सध्या आई होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि ते ती पूर्णपणे एन्जॉय करताना दिसत आहे.. सध्या तिच्या आयुष्यात आणि मुख्यतः वर्क फ्रंटवर ती जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे.

आलिया भट्ट सध्या आई होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि ते ती पूर्णपणे एन्जॉय करताना दिसत आहे.. सध्या तिच्या आयुष्यात आणि मुख्यतः वर्क फ्रंटवर ती जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 02 ऑगस्ट: आलिया भट्ट ही अभिनेत्री सध्या अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. आलियाने आई होण्याची बातमी शेअर केल्यापासून तिच्याबद्दल वारंवार वेगवेगळी माहिती समोर येत आहे. तिच्या कामाऐवजी तिच्या प्रेग्नंन्सीबद्दल वेगवेगळे नवे अपडेट रोज समोर येत आहेत. यातच आलियाने वर्क लाईफबद्दल एक नवं वक्तव्य केलं ज्याने ती बरीच चर्चेत येत आहे. आलिया सध्या तिच्या डार्लिंग्ज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया प्रेग्नन्ट असतानाही कामाला तितकंच महत्त्व देऊन कामाकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. प्रमोशनदरम्यान तिला (alia bhatt pregnancy and work life balance) वर्क लाईफबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ती सांगते, “जर तुम्ही फिट आणि तंदुरुस्त असाल, स्वतःची नीट काळजी घेत असाल तर तुम्हाला अराम करायची गरज नाही. माझं काम माझ्यासाठी समाधान देणारी गोष्ट आहे. ते माझं पॅशन आहे. माझा आत्मा आणि हृदय जिवंत ठेवायला ते मदत करतात. मी तर वयाच्या शंभरी पर्यंतही काम करू शकते.” आलियाने प्रेग्नंन्सीनंतर अनेक मुलाखतींमध्ये काम आणि पर्सनल लाईफ याबद्दल ठाम मत वक्त केलं आहे. तिच्या गरोदरपणाच्या बातमीनंतर एका न्यूज पोर्टलने लिहिलेल्या माहितीवर आलिया चांगलीच भडकली होती. “मी कोणतंही पार्सल नाही मी एक माणूस आहे. मला कोणीही कुठूनही पीक अप करायची गरज नाही.” असं सुद्धा मत तिने व्यक्त केलं होतं. हे ही वाचा- Alia Bhatt: प्रेग्नन्ट असताना आलियानं केलं ऍक्शनपॅक सिनेमाचं शूटींग, खुलासा करत म्हणाली... बॉलिवूड बबलशी बोलताना ती म्हटली, “कोणी माझ्याबद्दल वैयक्तिक काही कमेंट केली, माझ्या कामाबद्दल मत व्यक्त केलं तर मला चालेल पण कोणी जर स्त्रियांच्या एका अवस्थेमुळे किंवा आई होण्यामुळे तिचं आयुष्य बदलून जाईल अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर मी त्यावर नक्कीच प्रश्न उपस्थित करेन. ते केवळ माझ्याबद्दल बोललं गेलं म्हणून नाही पण त्या न्यायाने सगळ्या स्त्रियांबद्दल त्यांच्या शारीरिक अवस्थेतील बदलांबद्दल वाटेल ते मत व्यक्त केलं ते अयोग्य आहे. माझ्याबद्दल असा अनेक फेक न्यूज बनवण्यात आल्या आहेत. पण सध्या त्या पद्धतीने ज्या सुरात बातम्या दिल्या जात आहेत की अचानक आयुष्य बदलून जाईल, स्वप्न संपून जातील अशाप्रकारे एखाद्या घटनेचा गाभा पोहोचवला जात असेल तर ते खूप चुकीचं आहे.”
आलियाने स्वतःच्या गरोदरपणावर आलेल्या अनेक अपडेट्सबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आलियाने आयुष्यातील इतर गोष्टींवर स्वतःच्या प्रेग्नंसीमुले फरक पडून दिला नसून तिचं काम अधिक जोमाने सुरु आहे.याशिवाय आलियाने प्रेग्नन्ट असतानाच तिच्या पहिल्या ऍक्शनने भरलेल्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग केलं होतं. याचा अनुभव सुद्धा तिने अनेकठिकाणी शेअर केला आहे. गरोदरपणा किंवा आई होण्याची प्रोसेस ही स्त्रीचं आयुष्य थांबवते असा समज असणाऱ्यांचे विचार मोडून काढत आलिया सातत्याने काम करताना दिसत आहे. तिचा हा वर्क लाईफ फंडा चाहत्यांना बराच पसंत पडताना दिसत आहे.
First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Pregnancy, Workload

पुढील बातम्या