Home /News /entertainment /

OMG! 'या' अभिनेत्रीने आलिया-जान्हवीकडून हिसकावून घेतला JR NTR चा आगामी सिनेमा

OMG! 'या' अभिनेत्रीने आलिया-जान्हवीकडून हिसकावून घेतला JR NTR चा आगामी सिनेमा

ज्युनिअर एनटीआर आता दिग्दर्शक कोरताला शिवा (Kortala Shiva Upcoming Film) यांच्या अपकमिंग सिनेमात दिसणार आहे. ज्युनिअर एनटीआरसह (Jr NTR Upcoming Movie) या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री असणार याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 मे: आरआरआरच्या बंपर यशानंतर ज्युनिअर एनटीआर (Jr NTR RRR) आणि राम चरण हे दोन्ही अभिनेते केवळ दाक्षिणात्य सिनेमाच नाही तर देशभरातील चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाचे कलाकार बनले आहे. आता हे दोघं नव्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान ज्युनिअर एनटीआर आता दिग्दर्शक कोरताला शिवा (Kortala Shiva Upcoming Film) यांच्या अपकमिंग सिनेमात दिसणार आहे. या जोडीने याही आधी ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. ज्युनिअर एनटीआरसह (Jr NTR Upcoming Movie) या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री असणार याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती आलिया भट्ट RRR नंतर पुन्हा एकदा ज्युनिअर एनटीआरसह स्क्रीन शेअर करणार आहे. RRRच्या प्रमोशनदरम्यान आलियाने याबाबत उल्लेख देखील केला होता. रश्मिका-जान्हवीचं नावंही होतं चर्चेत मात्र आता आलिया हा सिनेमा करणार नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर जान्हवी कपूर आणि रश्मिका मंदाना या दोन अभिनेत्रींची वर्णी या सिनेमासाठी लागल्याचे समोर आले होते. मात्र मीडिया अहवालानुसार या सिनेमात ना आलिया दिसणार आहे ना रश्मिका-जान्हवी. या सिनेमामध्ये ज्युनिअर एनटीआरसह दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे. Jr NTR चा हा 30 वा सिनेमा असणार आहे. हे वाचा-महेश मांजरेकरांच्या लेकीचा स्टायलिश अंदाज, 'Major' मुळे पुन्हा एकदा Saiee Manjrekar चर्चेत ही अभिनेत्री असणार ज्युनिअर एनटीआरची हिरॉइन ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून दाक्षिणात्य सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi and Jr NTR Movie) आहे. बॉलिवूड लाइफने याविषयी वृत्त दिले आहे साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा आहे की ज्युनिअर एनटीआरच्या या सिनेमासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी साई पल्लवीला पसंती दिली आहे. साई पल्लवीने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. आता ज्युनिअर एनटीआर आणि साई पल्लवी यांची जोडी ऑनस्क्रीन कशी दिसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
    दरम्यान सोमवारी 09 मे रोजी साई पल्लवीने (Sai Pallavi Birthday) तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने तिच्या नव्या सिनेमाची घोषणाही तिने केली. 'गार्गी' या सिनेमात ती दिसणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या