सई मांजरेकर (Saiee Manjrekar) फिल्म 'मेजर' (Major) मध्ये अदिवी शेष (Adivi Sesh) च्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे.यामध्ये दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळते आहे. महेश मांजरेकरांच्या या लेकीने सलमान खानचा सिनेमा 'दबंग 3'मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.
तिचा अभिनय तर चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता मात्र दबंग 3 मध्ये अधिक स्क्रीन टाइम न मिळाल्याने तिला विशेष प्रसिद्धी मिळाली नाही. आता ती महेश बाबू (Mahesh Babu Film Major) चा दाक्षिणात्य सिनेमा 'मेजर'मध्ये दिसणार आहे. ट्रेलरमधून तिची खास झलक पाहायला मिळाली आहे.
फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर सई रिअल लाइफमध्ये देखील खूपच ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून इन्स्टाग्रामवर सईचे लाखो फॉलोअर्स आहेत.
सई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. अशी चर्चा आहे की सई साजिद नाडियाडवालाचा मुलगा सुभान नाडियाडवालाला डेट करत आहेत. कथित स्वरुपात दोघांना लंच आणि डिनरसाठी स्पॉट करण्यात आलं होतं.
दरम्यान सई आणि सुभान यांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे. मात्र सई तिच्या आगामी सिनेमाबाबत विशेष उत्सुक आहे. त्यासंदर्भातील अपडेट देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते
सई मांजरेकरच्या 'मेजर' सिनेमाबाबत बोलायचे झाले तर (Saiee Manjrekar Upcoming Film Major) हा सिनेमा 2008 साली झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये त्यांनी देशासाठी दिलेलं बलिदान आणि त्यागाबाबत भाष्य करण्यात आले आहे.
या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता आदिवी शेष आहे तर त्याच्या अपोझिट सई दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शशि किरण टिक्का यांचे असून महेश बाबू या सिनेमाचा निर्माता असणार आहे.