मुंबई, 13 जानेवारी- बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांप्रमाणेच स्टार किड्ससुद्धा तितकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त चर्चेत आहेत. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लेकीसोबत झालं आहे. अवघ्या 2 महिन्यांची राहा सध्या प्रचंड चर्चेत आहे. आलिया आणि रणबीरची लेक कशी दिसते? हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या दोघांनी अद्याप आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नसला तरी आता तो उघड झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलियाने आपल्या मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी आपल्या पहिल्या अपत्याचं नाव जाहीर केलं होतं. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणेच या दोघांनीसुद्धा नो फोटो पॉलिसी ठेवली आहे. या दोघांनी अद्याप राहाचा चेहरा दाखवलेला नाहीय. मात्र चाहते राहाला पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. **(हे वाचा:** Imran Khan B’day: जिनिलियासोबत हिट सिनेमा देणारा आमिरचा भाचा अचानक इंडस्ट्रीतून झाला गायब; सध्या कुठे आहे इम्रान? ) नुकतंच मीडियाने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लेकीला पाहिलं. नुकतंच विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि रणबीर कपूर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत चिमुकली राहासुद्धा आहे. परंतु आलिया आणि रणबीरच्या नो फोटो पॉलिसीचा मीडियाने चेहरा दाखवलेला नाही. या पोस्टमध्ये राहाच्या चेहऱ्यावर ईमोजी सेट करण्यात आला आहे. मात्र ई टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, राहा कपूर आई आलिया भट्टसारखीच क्युट दिसते.
काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी मीडियासोबत संवाद साधत, त्यांना राहा कपूरची झलक दाखवली होती. परंतु राहाचे फोटो क्लिक केले जाऊ नयेत असे आवाहन त्यांनी केलं होतं. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार राहा फारच क्युट आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्नगाठ बांधली आहे. परंतु असं म्हटलं जातं की, आलिया भट्ट लग्नापूर्वीच गरोदर होती. त्यामुळे त्यांनी घाईघाईत लग्न उरकलं होतं. आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.