'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे इम्रान खान होय. या चित्रपटात इम्रान खान आणि जिनिलिया देशमुखची जोडी सर्वांनाच प्रचंड पसंत पडली होती.
अभिनेता इम्रान खान आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आमिरचा भाचा असणारा इम्रान अचानक सिनेमातून का गायब झाला याबाबत जाणून घेऊया.
इम्रान खानने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र अभिनेता म्हणून त्याने ''जाने तू या जाने ना' या चित्रपटातून डेब्यू केला होता.
2015 मध्ये 'कट्टी बट्टी' या चित्रपटात त्याला शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यांनतर त्याने एका शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं होतं.
इम्रान खानचे काही चित्रपट हिट झाले. परंतु त्यानंतर अनेक चित्रपट पूर्णपणे फ्लॉफ झाले. त्यामुळे दिग्दर्शकांनी अभिनेत्याकडे कानाडोळा करायला सुरुवात केली.
त्यामुळे अभिनेत्याची मनस्थिती अशी झाली होती की, त्याने अभिनय सोडून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवायचा निर्णय घेतला.
इम्रान खानचं खाजगी आयुष्यसुद्धा कठीण आहे. अभिनेता नुकतंच पत्नी अवंतिकासोबत विभक्त झाला आहे. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.