मुंबई, 11 एप्रिल- सर्वसामान्य लोक असो किंवा बॉलिवूड सेलिब्रेटी प्रत्येक व्यक्तीच्या नात्यात कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात चढ-उतार येतच असतात. यामध्ये काही लोक माघार घेतात तर काही लोक अतिशय संयमाने त्या परिस्थितीला सामोरे जातात आणि आपलं नातं टिकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत ज्यांनी आपलं नातं टिकवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. यामध्ये बॉलिवूड दिग्दर्शक आणि नात्याने आलिया भट्ट चा भाऊ असणाऱ्या मोहित सुरीचादेखील समावेश होतो. मोहित आणि अभिनेत्री उदित गोस्वामीने आपलं नातं लग्नापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यांच्या 8 वर्षांच्या नात्यात अनेक चढउतार आले, पण दोघांनीही एकमेकांवर विश्वास ठेवून अखेर लग्नगाठ बंधली होती. अभिनेत्री उदिता गोस्वामी मूळची आसामची आहे. हायस्कूलमध्ये शिकत असताना तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. उदिताच्या आईने तिला डेहराडूनच्या ‘स्कूल ऑफ आर्ट अँड फॅशन टेक्नॉलॉजी’मध्ये पाठवलं होतं.
सोबतच तिला इतका आत्मविश्वास आणि पाठिंबा दिला होता की, ती बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहू लागली होती. हेच स्वप्न घेऊन तिने मुंबई गाठलं होतं. सुरुवातीला तिला ‘पाप’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. नंतर तिला ‘जहर’ या चित्रपटात कास्ट करण्यात आलं होतं. हा चित्रपट आलियाचा भाऊ दिग्दर्शक मोहित सूरीचा डेब्यू चित्रपट होता. याच चित्रपटानंतर मोहित आणि उदिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मोहित आलियाची आत्ती हिना भट्ट-सूरी यांचा मुलगा आहे. (हे वाचा: दुबईत नेमका कोणता व्यवसाय करतात बॉलिवूड सेलिब्रेटी? शाहरूख ते विवेक छापतात अब्जावधी रुपये ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, उदिता आणि मोहितने 2005 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आणि 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. असं म्हटलं जातं की, नात्याची सुरुवातीची वर्षे चांगली गेली, पण 2008-09 खास नव्हते. त्यांच्यात मतभेद होऊ लागले, परंतु प्रेमाने त्यांना एकत्र ठेवले. 2010 मध्ये हे जोडपे पुन्हा एकत्र आले. ‘क्रुक’ रिलीज झाल्यानंतर हे जोडपे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण तसे झाले नाही. मात्र, काही वर्षांनी 29 जानेवारी 2013 रोजी त्यांचं लग्न झालं होतं.
मोहित सुरीने एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझ्यासाठी, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तो दिवस लग्नापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. उदिता आणि मोहितला पॉवर कपल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. उदिता मोहितच्या दिग्दर्शनाच्या आवडीला प्रचंड जपते. त्याच्या चित्रपट निर्मितीच्या आवडीची काळजी घेते. आपल्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईल अशारितीने उदिताने आपल्या लग्नाची योजना आखली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी या जोडप्याला मुलगी झाली. आज हे जोडपं दोन मुलांचे पालक आहेत. 39 वर्षांची उदिता गोस्वामी गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण म्युझिकच्या आवडीमुळे ती नाईट क्लबमध्ये डीजे म्हणून काम करते. ETimes ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिने म्हटलं होतं की, ‘मी भारतातील एकमेव सेलिब्रिटी डीजे असेल.’ तर पती-दिग्दर्शक मोहित सुरीने आशिकी 2, एक व्हिलन रिटर्न, हमारी अधुरी कहाणी यांसारखे हिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.