जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दुबईत नेमका कोणता व्यवसाय करतात बॉलिवूड सेलिब्रेटी? शाहरूख ते विवेक छापतात अब्जावधी रुपये

दुबईत नेमका कोणता व्यवसाय करतात बॉलिवूड सेलिब्रेटी? शाहरूख ते विवेक छापतात अब्जावधी रुपये

शाहरुख ते विवेकाचे दुबईत अब्ज रुपयांचे प्रोजेक्ट

शाहरुख ते विवेकाचे दुबईत अब्ज रुपयांचे प्रोजेक्ट

Which Indian celebrities do business in Dubai: सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींनासुद्धा दुबईचं वेड लागलं आहे. टुरिस्ट डेस्टिनेशनसोबत असण्यासोबतच दुबई एक बिझनेस हबसुद्धा बनलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल- सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींनासुद्धा दुबईचं वेड लागलं आहे. टुरिस्ट डेस्टिनेशनसोबत असण्यासोबतच दुबई एक बिझनेस हबसुद्धा बनलं आहे. अलीकडच्या काही काळात बिझनेस करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी दुबईची वाट धरली आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांना बऱ्यापैकी यश मिळतांनासुद्धा दिसून येत आहे. या यादीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सोबत अभिनेता विवेक ओबेरॉय पर्यंत अनेक सेलेब्रेटींचा समावेश आहे. दुबईचं सौंदर्य आणि आलिशान लाईफस्टाईल जवळजवळ सर्वांनाच आकर्षित करते. या गोष्टीला सेलिब्रेटीसुद्धा अपवाद नाहीत. बॉलिवूड अनेक मोठ्या कलाकारांनासुद्धा दुबईची भुरळ पडली आहे. गेल्या काही वर्षात दुबईचं टुरिझम प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे दुबईतील उद्योगधंद्यांचीही वाढ झाली आहे. आणि म्हणूनच यश्वी उद्योजक बनण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी दुबईमध्ये विविध प्रोजेक्टस अंतर्गत पैसा गुंतवण्यास पसंती दर्शवली आहे. (हे वाचा: Sonam Kapoor: घर की राजवाडा! मुलाला घेऊन पहिल्यांदाच सासरी पोहोचली सोनम;दिल्लीचं घर पाहून दिपतील डोळे ) गेल्या 3-4 वर्षांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी दुबईत उद्योगधंद्यांत यशस्वीपणे आपला जम बसवला आहे. शाहरुख खान ते विवेक ओबेरॉयपर्यंत या अभिनेत्यांनी रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसाय, स्पोर्ट्स अकॅडमी, ऍक्टिंग क्लासेस अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे दुबईत उद्योगधंदयासाठी फायदेशीर असलेली कर सवलतसुद्धा मिळते. फारच कमी लोकांना माहिती असेल की, दुबईच्या 93लाख लोकसंख्येमध्ये जवळजवळ 38 टक्के भारतीय लोक आहेत. शाहरुख खान-गौरी खान- बॉलिवूड स्टार शाहरुख खान जितका यशस्वी अभिनेता आहे तितकाच यशस्वी उद्योजकसुद्धा आहे. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे विविध व्यवसायांत गुंतवणूक करत असतात. दुबईमध्ये शाहरुख आणि गौरीने रिअल इस्टेट आणि हाऊसिंग उद्योगत गुंतवणूक केली आहे. सुमारे 66 अब्ज डॉलरची गुंतवणूक असलेल्या या प्रोजेक्टचं काम सध्या सुरु आहे. विवेक ऑबेरॉय- विवेक ऑबेरॉय बॉलिवूडमध्ये फारसा यशस्वी नसला तरी तो एक यशस्वी व्यावसायिक आहे. विवेक दुबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात भागीदारीत पैशांची गुंतवणूक करत आहे. या अंतर्गत सध्या 8 मोठे प्रोजेक्ट सुरु आहेत. शिवाय आगामी काळात लॅब ग्रोन डायमंडचे जवळजवळ 5 शोरुम उघडण्याची त्याची वाटचाल सुरु आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आणखी सेलिब्रेटींचाही समावेश- ज्येष्ठ गायिका आशा भोसले दुबईत आलिशान रेस्टोरंट चालवतात. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नीसुद्धा दुबईत व्यवसाय करते. तसेच मोहब्बतें फेम अभिनेत्री प्रीती झंगियानीसुद्धा दुबईत स्पोर्ट्स अकॅडमी चालवते. अभिनेत्री राखी सावंतने दुबईत ऍक्टिंग स्कुल सुरु केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात