**मुंबई, 04 नोव्हेंबर : ‘**कौन बनेगा करोडपति’च्या (KBC 12) सेटवर आतापर्यंत आपण महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्या चाहत्यांना पाहिलं. जो कुणी स्पर्धक इथं आला त्यानं आपण बिग बी यांचे फॅन आहोत असंच सांगितलं. मात्र यावेळी पहिल्यांदाचा बिग बी (big b) यांना ‘कौन बनेगा करोड़पति-12’ च्या सेटवर अशा स्पर्धकाचा सामना करावा लागली, जिला बिग अजिबात आवडत नाही. तिला त्यांचा खूप राग येतो. ‘कौन बनेगा करोड़पति-12’ च्या मंगळवार एपिसोडमध्ये दिल्लीतील 27 वर्षांची रेखा रानी ही स्पर्धक आली होती. तिनं केबीसीच्या सेटवरच अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून ऑन स्क्रिन सांगितलं की तिला अमिताभ बच्चन अजिबात आवडत नाही. अमिताभ बच्चन यांना हे ऐकून आश्चर्यच वाटलं. त्यांनी तिला याचं कारण विचारलं, तेव्हा तिनं शाहरूख खानचं नाव घेतलं. रेखा ही शाहरूख खानची फॅन आहे आणि तिला अमिताभ बच्चन अजिबात आवडत नाही कारण ते फिल्ममध्ये शाहरूखसोबत अजिबात चांगले वागत नाहीत.
रेखा म्हणाली, अमिताभ यांनी शाहरूखसोबत जितक्या फिल्ममध्ये काम केलं, त्या सर्व फिल्ममध्ये ते शाहरूखसोबत नीट वागले नाहीत. ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये त्यांनी शाहरूखला घराबाहेर काढलं. ‘मोहब्बतें’ ते शाहरूखविरोधात उभे राहिले. हे वाचा - ‘रक्त लागलेली साडी दिली’; मालिकेचा वाद विकोपाला! अलका कुबल यांच्यावरही आरोप अमिताभ यांनी रेखाला सांगितलं की, फिल्मच्या स्क्रिप्टमध्ये त्यांना जसं सांगितलं त्यांनी तसंच केलं. तरी रेखा काही ऐकली नाही. अखेर तिनं अमिताभ यांना माफी मागायलाच लावली. अमिताभ यांनी तिला सॉरी म्हटलं. तसंच शाहरूख खानचीदेखील आपण माफी मागू असं त्यांनी रेखाला सांगितलं. हे वाचा - जेठालालचा हा प्रसिद्ध डायलॉग सापडला होता वादात, न वापरण्याची मेकर्सची ताकिद अमिताभ आणि शाहरूख यांच्या ‘मोहब्बतें’ फिल्मला गेल्या आठवड्यातच 20 वर्षे पूर्ण झालीत. शाहरूखने ट्विटरवर एका चॅट सेशनमध्ये अमिताभ सोबत या फिल्ममधील आठवणींना उजाळा दिला होता.