मुंबई, 08 सप्टेंबर : रिचा चढ्ढा आणि अली फजल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ते अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला वेग आला आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. आता हे दोघेही आपल्या नात्याला नवीन रूप द्यायला सज्ज झाले आहेत. आता अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रिचा आणि अलीचा शाही विवाहसोहळा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. रिचा आणि अलीचा पाच दिवस विवाहसोहळा पार पडणार आहे. तर मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीत रिचा आणि अलीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत एका ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत नियोजित अंतिम भव्य सोहळ्यासह लग्नाचा उत्सव दिल्लीत सुरू होईल. लग्नाच्या विधींव्यतिरिक्त, जोडप्याने कुटुंब आणि मित्रांना संगीत आणि मेहंदी समारंभ आयोजित करण्याची योजना आखली आहे. हे रिसेप्शन दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये ३५०-४०० पाहुण्यांसह होणार आहे, ज्यात बॉलिवूडमधील त्यांचे कलाकार मित्र सहभागी होतील हेही वाचा - Katrina kaif: विकी कौशल माझ्या रडारवर कधीच नव्हता’; लग्नानंतर कतरिनाचा धक्कादायक खुलासा खरंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल एप्रिल 2020 मध्येच लग्नाच्या बेडीत अडकणार होते परंतु कोरोनामुळे झालेल्या लोकडाऊनमुळे त्यांना लग्नाचा प्लॅन पुढे ढकलावा लागला होता. गेल्या महिन्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना रिचा हिने तिच्या लग्नाबद्दल योजनांची माहिती दिली होती. “मला वाटतं आम्ही या वर्षी लग्न करू, कसे तरी लग्न करू. आम्ही लग्न करण्यासाठी खूप उत्सुक आहोत पण आम्ही फक्त कोविडबद्दल विचार करत होतो आणि जबाबदार व्हायचे होते, ”ती म्हणाली, “आम्हाला चुकीच्या कारणांमुळे बातम्यांमध्ये राहायचे नाही. शिवाय, आम्ही दोघे खरोखर, खरोखर व्यस्त होतो आणि काम पूर्ण वेगाने सुरू होते म्हणून वेळ भेटत नव्हता पण या वर्षी आम्हाला एकत्रित तारखा घेण्याचे योग आला आणि हे घडून आले.
हे जोडपे त्यांच्या फुक्रे चित्रपटाच्या सेटवर 2013 मध्ये भेटले होते. अनेक वर्ष डेट करून डिसेंबर 2019 मध्ये अलीने मालदीवमध्ये सुट्टीवर असताना रिचाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केले होते.आता हे दोघे लग्न करणार आहेत. रिचा आणि अलीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, येत्या काळात हे दोघेही ‘फुक्रे 3’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. अली ‘मिर्झापूर 3’ या वेब्सिरिज्मध्ये झळकणार असून ऋचा संजय लीला भन्साळीच्या आगामी वेब सीरिज ‘हिरामंडी’ मध्ये भूमिका साकारणार आहे. आता या दोघांच्या लग्नाकडे चाहत्यांच्या नजरा टिकून आहेत.