मुंबई 7 जून: अभिनेत्रीचं आयुष्य तसं बघायला गेलं तर एका विशिष्ट वेळेला बांधलेलं नसत. कोणत्याही ऑफिससारखं आठ तासात संपणारं काम नसल्याने अनेकदा घरच्यांना समजावणं आणि सांभाळणं कठीण होतं. अशीच एक आठवण अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) हिने शेअर केली आहे. तिच्या कामाबद्दल तिच्या घरच्यांना वाटणारी काळजी तिने एका पोस्टमधून व्यक्त केली आहे. अक्षया नाईक सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharali) या मालिकेत दिसत आहे. तिच्या अनोख्या अभिनयशैलीने तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिच्या प्लस साईज बॉडी पॉजिटिव्हिटी या विषयावर तिचं असलेलं गांभीर्य यासाठी तिचं कौतुक सुद्धा होत आहे. अक्षयाने नुकतीच एक भलीमोठी पोस्ट शेअर करून आपल्या कामाबद्दल त्याच्या स्वरूपाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अक्षया नुकतीच ऋषिकेशला जाऊन आली. तिकडे तिने खूपच धमाल केली. पण त्याचसोबत हा प्लॅन कसा केला आणि आईबाबांना कशी चिंता लागून राहिली होती यावर तिने बरंच काही लिहिलं आहे. ती असं लिहिते, “माझे आईवडील माझ्या ट्रॅव्हलिंग बाबत कायमच काळजीत असतात. मी कधीच एका जागी स्थिर राहू शकत नसल्याने मी सतत कुठे ना कुठे जात असते. ठरवलेलं एक स्थळ सोडून मी आणखी बरीच ठिकाणं पालथी घालते. या सगळ्यात मला आईबाबांना योग्य वेळी माहिती देता आली नाही की ते काळजीत पडतात. त्यामुळे त्यांना माझा जॉब माझं करिअर हे किती वेगळ आहे हे पटवून देण्यात बराच वेळ गेला. मी माझ्या शूटिंग साठी कधीच एके ठिकाणी नसते हे त्यांना सांगणं आणि पटवून देणं अवघड गेलं.”
ती पुढे असंही म्हणते,”ही काळजी आजही टिकून आहे जेव्हा मी त्यांना अचनपणे येऊन वेगळ्याच शहरात फिरायला जाण्याचा प्लॅन सांगते. घरातलं शेंडेफळ असल्याने माझा आत्मविश्वास एवढा आहे की मी दिल्ली ते गोवा एवढी दोन टोकं सुद्धा गाठू शकते. हे ही वाचा- सोज्वळ सायली संजीवचा मॉर्डन हेअरकट, मोकळ्या केसात दिसतेय Cutiepie पण कालांतराने माझे पालक माझ्या या सवयीशी जुळवून घेत आहेत. तरीही बाबांना थोडी धाकधूक असते.” अशा शब्दात तिने तिच्या पालकाना असलेली काळजी व्यक्त केली आहे. पुढे लिहीत तिने सांगितलं आहे की आपल्या पालकाना काळजी वाटू नये म्हणून कायम आपलं लाईव्ह लोकेशन त्यांना शेअर करून ठेवावं. आणि आपण जाणार असलेल्या लोकेशनबद्दल खोटं बोलू नये असा सल्ला सुद्धा तिने सोलो किंवा ग्रुप ट्रॅव्हल करायचा बेत करणाऱ्यांना दिला आहे. अक्षयच्या या पोस्टने तिचं तिच्या आईवडिलांशी असलेलं घट्ट नातं कळून येतं.