जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सोज्वळ सायली संजीवचा मॉर्डन हेअरकट, मोकळ्या केसात दिसतेय Cutiepie

सोज्वळ सायली संजीवचा मॉर्डन हेअरकट, मोकळ्या केसात दिसतेय Cutiepie

सोज्वळ सायली संजीवचा मॉर्डन हेअरकट, मोकळ्या केसात दिसतेय Cutiepie

नुकताच सायलीनं न्यू (sayali sanjeev new haircut ) हेअरकट केला आहे. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जून- ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव (sayali sanjeev ) नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी क्रिकेटर ऋतुराज गायकवाडमुळे तरी कधी तिच्या फोटोशुटमुळे ती चाहत्यांचे नेहमीच लक्षवेधून घेताना दिसते. मालिकेत सोज्वळ भूमिका साकारणारी सायली संजीव मात्र खऱ्या आयुष्याच खूपच मॉर्डन आहे. नुकताच सायलीनं न्यू (sayali sanjeev new haircut ) हेअरकट केला आहे. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. सायली संजीवने नुकतेच काही फोटो इन्स्टाला शेअर केले आहेत. या फोटोत सायलीनं केस मोकळे सोडल्य़ाचे दिसत आहे. तिनं या फोटोंना कॅप्शन देत म्हटलं आहे की, नवीन फ्रेश हेअरकट करण्यात एक वेगळाच आनंद आहे. तिचा हा हेअरकट चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरला आहे. वाचा- ‘काश्मिर फाईल्स’ फेम विवेक अग्निहोत्रींनी शिवसेनेला डिवचलं, केलं सूचक ट्वीट एका चाहत्यांने कमेंट करत म्हटलं आहे की, वॉव टू क्यूट तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, नेहमीप्रमाणे गोड आणि अजून अजून लहान दिसतेयस❤️❤️ तर आणखी एकानं म्हटलं आहे की,एकदम गोड❤️😍 अशा अनेक गोड कमेंट सायलीच्या या हेअरकटवर आल्या आहेत.

जाहिरात

सायली संजीवने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत काम केले. या मालिकेतील तिच्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. काही दिवसांपूर्वी ती झिम्मा या चित्रपटातही झळकली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात