जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / #shivaniwedsvirajas : शुभमंगल सावधान! अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शिवानी- विराजसनं बांधली लग्नगाठ, समोर आले फोटो

#shivaniwedsvirajas : शुभमंगल सावधान! अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शिवानी- विराजसनं बांधली लग्नगाठ, समोर आले फोटो

#shivaniwedsvirajas : शुभमंगल सावधान! अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शिवानी- विराजसनं बांधली लग्नगाठ, समोर आले फोटो

आज अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर या क्यूट कपल शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो(Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding Photos) समोर आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे- Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding : सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहे. मराठीत देखील असे काही कपल आहेत ते लवकरच लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक कपल म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे आहे. नुकताच या दोघांचा मेंदी सोहळा पार पडला होता. आज अक्षय्य  तृतीयाच्या मुहूर्तावर या क्यूट कपलनं लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो**(Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding Photos)** समोर आले आहेत. चाहत्यांसह सेलेब्सकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराजस कुलकर्णीनं नुकतेच त्याच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यानं म्हटलं आहे की,Finally! ❤️#married #couple #thisisus..दोघंही खूप सुंदर दिसत आहे. पारंपारिक पद्धतीनं या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. आज, 3 मे रोजी अक्षय्य  तृतीयाच्या मुहूर्तावर मनोरंजन विश्वातील ही लोकप्रिय जोडी लग्नाच्या बंधनात अडकली आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड़ व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

वाचा-रिअल लाइफमध्येही राणादा-पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; हार्दिक जोशी-अक्षया देवधरने केला साखरपुडा! अशी आहे विराजस आणि शिवानीची लव्हस्टोरी’ डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. ‘अनाथेमा’ या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसंच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.

‘थेटर ऑन एंटरटेनमेंट’ ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती देखील केली आहे.तर ‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यामध्ये ‘सांग तू आहेस ना’ ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या प्रमुख मालिकांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात