मुंबई, 3 मे- Hardik Akshaya Engagement : बॉलिवूडनंतर सध्या मराठी मनोजरंजन विश्वात लग्नाचे वारे जोराने वाहत आहे. नुकताच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा मेहंदी सोहळा पार पडला. लवकरच मराठीतील ही स्वीट कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. याशिवाय ह्रता हृता दुर्गुळे देखील लवकरच निर्माच प्रतिक शाह याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आता मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तुझ्यात जीव रंगलामधील सर्वांचं लाडकं कपल राणादा आणि पाठक बाई यांचा खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांत (akshaya deodhar hardeek joshi egngagement ) जीव रंगला आहे. या दोघांनी आज अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर साखपुडा केला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ ( Hardik Akshaya Engagement Video) समोर आला आहे. या स्वीट कपलवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत असतानाचा या दोघांच्या साखरपुड्याचा एक रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे हार्दिक जोशीनं त्याच्या इन्स्टावर साखरपुड्याचा रोमॅंटिक असा व्हिडिओ शेअर केला आहे. अगदी फिल्मी स्टाईलनं हार्दिकनं अक्षया देवधरच्या बोटात रिंग घातली आहे. अक्षयानं देखील हार्दिकला एकदम रोमॅंटिक गाणं म्हणत त्याच्या बोटात रिंग घातली आहे. दोघांच्यातील प्रेम पाहून चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. दोघही खूप सुंदर दिसत आहे. वाचा-रिअल लाइफमध्येही राणादा-पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; हार्दिक जोशी-अक्षया देवधरने केला साखरपुडा! झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली. आपला विश्वास बसणार नाही पण आता ही ऑनस्क्रीन जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे सेलिब्रिटी कपल आता विवाह बंधनात अडकणार आहे. अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र आता या दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून आपलं नात सर्वांसमोर जाहीर केलं आहे.