**मुंबई, 15 ऑक्टोबर :**झी मराठीवरील गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला मध्ये राणादा आणि पाठकबाईंची जोडी एकदम हिट झाली होती. त्यांच्या प्रेमकहाणीला भरभरून प्रेमसुद्धा मिळालं होतं. आता हे रील लाईफ कपल रियल लाईफमध्ये सुद्धा एकमेकांशी लग्न करणार आहेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला असून आता त्यांच्या लगीनघाईचे वेध लागले आहेत. हार्दिक आणि अक्षया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत हे नक्की असलं तरी त्यांच्या वेडिंग डेटबद्दल कोणताही अपडेट समोर आलेली नाही. पण या जोडीच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं मात्र समोर आलं आहे. नुकतंच अक्षयाची बॅचलर पार्टी झाली होती. आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या जवळची मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतीच अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीच्या विणकामाचा श्री गणेशा करण्यात आला. या सगळ्यांनी मिळून अक्षया जी साडी लग्नावेळी नेसणार आहे ती विणण्याचा शुभारंभ पुण्यात केला आहे. साडी विणण्याचा हा विधी प्री-वेडिंगमधील भाग झाला आहे. याआधीही काही कलाकार दाम्पत्यांनी त्यांच्या लग्नाच्या आधी हा विधी केला होता. आता हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाचा हा विधी नुकतंच पार पडला आहे. हेही वाचा - Mazhi Tuzhi Reshimgaath: यश आणि नेहाचा जीव धोक्यात; चौधरी कुटुंबावर ओढवणार नवीन संकट या विधीला अक्षया -हार्दिकसह जवळचे कुटुंबीय तसेच मित्रमंडळी उपस्थित होते. अक्षयाच्या साडीतील काही धागे हार्दिकनं स्वतःच्या हातांनी विणले. तसंच या साडीतील काही धागे देवधर आणि जोशी कुटुंबातील प्रमुख सदस्यांनीही विणले. लक्षणे तिच्या सोशल मीडियावर या विधीचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी कलाकारांमध्ये अमोल नाईक, ऋचा आपटे आणि वीणा जगतापही उपस्थित होती.
अभिनेत्री वीणा जगतापने सुद्धा यावेळी अक्षयाच्या साडीतील काही धागे विणले. तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले कि, ‘‘Akshu & Hardeek तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा. कालचा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला आणि मुख्य म्हणजे नवीन काही तरी केलं आपण आणि ही concept मला खुप आवडली , काल Akshu च्या लग्नाची साडी विणायला घेतली तर आम्ही सगळ्यांनी दोन - दोन धागे विणले आणि वेगळंच समाधान मिळालं ,,,, खुप मज्जा आली , नवीन आठवणी तयार झाल्या…’’
हार्दिक आणि अक्षया इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय आहेत. अक्षया आणि हार्दिक यांनी ३ मे रोजी साखरपुडा झाला. दोघेही साखरपुड्यापासून नेहमीच एकमेकांशी निगडित अपडेट शेअर करत आले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या लाडक्या राणादा आणि अंजलीबाईंना एकत्र बघायला चाहते उत्सुक झाले आहेत. आता त्यांच्या चाहत्यांचे डोळे लग्न सोहळ्याकडे लागले आहेत.

)







