

बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन (Amy Jackson) नऊ महिन्यांची गरोदर आहे. कोणत्याही क्षणी ती गोड बातमी देऊ शकते. असं असलं तरी ती तिचे हे दिवस चांगलेच एन्जॉय करत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)


नुकताच अॅमी जॅक्सनचा बेबी शॉवर नुकताच पार पडला. यावेळचे काही फोटो अॅमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)


अॅमी जॅक्सनच्या बेबी शॉवरमध्ये ब्लू कलरची थीम ठेवण्यात आली होती त्यामुळे केक, कुकीज, चॉकलेट्स हे सर्वच ब्लू कलरमध्ये होतं. याशिवाय डेकोरेशनमध्येही ब्लू कलरचा वापर करण्यात आला होता. (फोटो- इन्स्टाग्राम)


बेबी शॉवर पार्टीमध्ये ब्लू कलरची थीम ठेवण्यामागे कारणही तसंच खास होतं. या पार्टीमध्ये अॅमीनं मुलाला जन्म देणार असल्याचं जाहीर केलं. याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ब्लू कलर हा मुख्यतः मुलांसाठी वापरला जातो. त्यामुळे अॅमीनं या पार्टी थीमसाठी ब्लू कलरची निवड केली.


अॅमी जॅक्सनच्या या बेबी शॉवरमध्ये तिच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अॅमीनं ब्लू कलरचा वनपीस घातला होती यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो- इन्स्टाग्राम)


अॅमी जॅक्सन येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. तिनं मे महिन्यात बॉयफ्रेंड George Panayioutou याच्याशी साखरपुडा केला आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)