पोटावरील स्ट्रेचमार्क्समुळे ट्रोल करणाऱ्यांना झरीन खाननं दिलं सडेतोड उत्तर

पोटावरील स्ट्रेचमार्क्समुळे ट्रोल करणाऱ्यांना झरीन खाननं दिलं सडेतोड उत्तर

नुकताच झरीननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : सलमान खानच्या वीर सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान मागच्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी यशस्वी होऊ शकलेली नाही. त्यावेळी सलमान आणि कतरिनाचं ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं झरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. तिचा चेहरा थोडाफार कतरिनाशी मिळता जुळता असल्यानं सलमान-झरीनच्या अफेअरच्या चर्चाही झाल्या. मात्र त्या सर्व अफवा असल्याचं समोर आलं. मात्र वीर नंतर झरीन फारशी बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली नाही. पण ती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकताच झरीननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

झरीननं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एक व्हाइट क्रॉप टॉमध्ये दिसत आहे. यासोबत तिनं ब्लॅक पायजमा मॅच केला आहे. मात्र तिनं घातलेल्या या क्रॉप टॉपमधून तिच्या पोटावरील स्ट्रेचमार्क्स दिसत आहेत. यावरुनच तिला ट्रोल केलं जात आहे. एका युजरनं लिहिलं, तिच्या पोटावर काय झालं आहे. कोणी नोटीस केलं आहे का? तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, पोटाची काय अवस्था केली आहे. आणखी एकानं लिहिलं, तू आता म्हातारी झालीस. याशिवाय अनेकांनी वेगवेगळ्या नकारात्मक कमेंट सुद्धा लिहिल्या आहेत. मात्र त्यानंतर झरीननं या सर्वांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

झरीननं तिच्या इनस्टा स्टोरीवर एक पोस्ट लिहित या सर्वांना चांगलीच चपराक दिली. तिनं लिहिलं, ‘ज्या लोकांना माझ्या पोटावर काय झालंय हे जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी हे लिहित आहे. हे एक अशा व्यक्तीचं पोट आहे. जिनं 50 किलो वजन कमी केलं आहे. कोणत्याही फोटोशॉप किंवा सर्जरीशिवाय ते असं दिसतं. मीएक अशी व्यक्ती आहे जी वास्तव जगात जगण्याचा प्रयत्न करते आणि त्यावरच विश्वास ठेवते.’

झरीननं पुढे लिहिलं, मी परफेक्ट नाही आहे. पण मला स्वतःचा अभिमान वाटतो. मी हे लपवत नाही आहे. झरीनच्या या पोस्ट नंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं तिचं कौतुक केलं आहे आणि तिला धाडसी म्हटलं आहे. अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिलं, झरीन तू खूप सुंदर आहेस. धाडसी आहेस आणि स्ट्राँग सुद्धा. तू जशी आहेस तशी परफेक्ट आहेस. सध्या झरीन राजस्थानमध्ये शूट करत असून हा फोटो त्या ठीकाणचा आहे.

==============================================================

नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 1, 2019, 3:06 PM IST

ताज्या बातम्या