करीनाने सासूलाच थेट विचारला 'त्या' बिकिनी फोटोशूटवर प्रश्न, शर्मिला टागोरची प्रतिक्रिया कशी होती पाहा VIDEO

करीनाने सासूलाच थेट विचारला 'त्या' बिकिनी फोटोशूटवर प्रश्न, शर्मिला टागोरची प्रतिक्रिया कशी होती पाहा VIDEO

शर्मिला त्या काळच्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांनी ‘इव्हिनिंग इन पॅरिस’मध्ये बिकिनी घातली होती. यासोबतच त्यांचं यावेळचं बिकिनी फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर त्यांच्या निरागसतेसाठी ओळखल्या जातात. पण यासोबत त्या आणखी एका गोष्टीसाठी ओळखल्या जातात ती गोष्ट म्हणजे, शर्मिला त्या काळच्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांनी ‘इव्हिनिंग इन पॅरिस’मध्ये बिकिनी घातली होती. यासोबतच त्यांचं यावेळचं बिकिनी फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांचं हे फोटोशूट आजही तेवढंच चर्चेत आहे. जेवढं ते त्यावेळी होतं. अनेक वर्षांनंतर शर्मिलांना पुन्हा एकदा या फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि यावेळी त्या काहीशा त्रासलेल्या दिसल्या. विशेष म्हणजे त्यांना हा प्रश्न त्यांचीच सून करिना कपूर खाननं विचारला.

करिना कपूर खानचा रेडिओ शो ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ नवा सीझन नुकताच सुरू झाला असून या शोमध्ये तिच्या पहिल्या गेस्ट म्हणून शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली होती. या शोचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात करिना तिच्या सासू शर्मिला टागोर यांच्यासोबत त्यांच्या त्याकाळी बिकिनी घालण्याबद्दल बोलताना दिसत आहे. करिना तिच्या प्रश्नाला सुरुवात करते, ‘तुमच्या रीअल लाइफकडून आता रिल लाइफकडे येऊयात. मला वाटतं तुम्ही ती पहिली अभिनेत्री होता ज्यांनी स्विमसूट घालून...’ इतक्यात तिचं बोलणं मध्येच तोडत शर्मिला म्हणतात, मला वाटतं मी यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही. पूर्ण इतिहास शर्मिला टागोर आणि तिची बिकिनी याबद्दलच लिहिला जाणार आहे.

जॉन अब्राहमची पत्नी असते लाइम लाइटपासून दूर, काय आहे कारण

शर्मिला यांची होणारी चिडचिड पाहून करिना लगेच त्यांचं कौतुक करत म्हणते, नाही पण मला वाटतं की हा एक आयकॉनिक क्षण होता. जेव्हा आमच्या पीढीचे लोक हे पाहतात तेव्हा ते फक्त एकच बोलतात, ‘ओह माय गॉड... कोणी बिकिनीमध्ये एवढं सुंदर कसं दिसू शकतं’ यावर शर्मिला म्हणतात, ‘आता तुम्ही भलेही असं बोललात तरीही...’

करिना पुढे तिचा प्रश्न पूर्ण करत म्हणाली, मला जाणून घ्यायचं आहे त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या. कारण त्यावेळी तुमचं लग्न होणार होतं. यावर शर्मिला म्हणाल्या, मी लंडनला होते आणि जेव्हा भारतात परतले तोपर्यंत फिल्मफेअरमध्ये हे सर्व छापून आलं होतं. बरं झालं त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं. या सगळ्याबद्दल खूप बोललं जात होतं. मला माझे सह-अभिनेता शक्ती सामंत यांचा फोन आला. मला ते म्हणाले लवकर भेटायला ये. महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्यांना भेटायला गेले. तेव्हा ते म्हणाले, ‘तुला कळतंय का तू काय केलं आहेस. तुला वाटत असे की हे सर्व काही ठिक आहे तर असं नाही आहे. तुला हे अजिबात शोभत नाही. हे खूप चुकीचं आहे. आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे.’ पण मला वाटत होतं की मी त्यात चांगली दिसत होते.

रितेशच्या Love You मेसेजला विद्याकडून आला KISSING स्माईलीचा रिप्लाय आणि...

शर्मिला पुढे म्हणाल्या, ‘ते म्हणाले की अभिनेत्री असं करत नाहीत. आता आपल्याला हे सुधारावं लागेल. नाही तर तुझं करिअर संपलं असं समज. मला त्यावेळी खूप काळजी वाटत होती. मी लगेच टायगरना (मन्सूर अली खान पतौडी) टेलिग्राम केला. त्यावर त्यांनी उत्तरात म्हटलं, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू सुंदरच दिसली असशील. त्यांचा हा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला.’

करिना कपूरच्या या शोमध्ये लवकरच सैफ अली खान सुद्धा दिसणार आहे. याआधी करिना आणि तिची सासू शर्मिला टागोर एका साबणाच्या जाहिरातीत एकत्र दिसले होते.

...म्हणून बर्थडे बॉय जाॅन अब्राहम वयाच्या 47 व्या वर्षीही आहे इतका फिट

Published by: Megha Jethe
First published: December 17, 2019, 4:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading