मुंबई, 17 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग3’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. त्याचा हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. पण त्यापूर्वी सलमान खान रोमांसच्या बाबतीत किंग शाहरुख खानला टक्कर देताना दिसत आहे. सलमान खानचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो रोमांस किंग शाहरुखला टक्कर देताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सलमाननं स्वतःच त्याच्या सोशल मीडिया आकउंटवर शेअर केला आहे. ज्यात तो शाहरुख खानसोबत स्पर्धा करताना दिसत आहे. सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान आहे की मी? खुशीच्या मनातली गोष्ट ओळखणं एवढं सोपं नाही. ‘दबंग 3’ मध्ये चुलबुल पांडे त्याची गर्लफ्रेंड खुशीला विचारतो तिला काय आवडतं. त्यावर खुशी सांगते मला तुम्ही, मामा आणि माझी मैत्रिण राजेश्वरी आवडते. पण चुलबुल पाहतो की खुशीच्या रुममध्ये सगळीकडे शाहरुख खानचे पोस्टर लावलेले असतात. इतकच नाही तर एका पोस्टरमध्ये तर शाहरुखच्या बाजूला खुशीनं स्वतःचा फोटो चिकटवलेला असतो. अरबाज खानमुळे मलायकाची मॉडेलसोबत होतायत भांडणं ?
‘दबंग 3’ मध्ये सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच प्रमोद खन्ना, अरबाज खान, सुदीप किच्चा हे सुद्धा या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभूदेवानं केलं आहे. रितेशच्या Love You मेसेजला विद्याकडून आला KISSING स्माईलीचा रिप्लाय आणि… जॉन अब्राहमची पत्नी असते लाइम लाइटपासून दूर, काय आहे कारण

)







