VIDEO : शूटिंग दरम्यान हारनेसवर बेशुद्ध झाला कॉमेडियन, अक्षय कुमारनं वाचवला जीव

एका अ‍ॅक्टसाठी हासरनेसवर लटकलेला हा कॉमेडियन अभिनेता अचानक बेशुद्ध झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 02:01 PM IST

VIDEO : शूटिंग दरम्यान हारनेसवर बेशुद्ध झाला कॉमेडियन, अक्षय कुमारनं वाचवला जीव

मुंबई, 05 ऑक्टोबर : अभिनेता अक्षय कुमार नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. कधी फिटनेस तर कधी कोणाला काही मदत करण्याचं निमित्त. पण तो स्वतः कधीच याचा गाजावजा  करत नाही. अशाच एका कारणानं अक्षय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका टीव्ही शो दरम्यान अक्षयनं दाखवलेलं प्रसंगावधान कॅमेऱ्यात कैद झालं आणि त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अक्षय एका व्यक्तीचा जीव वाचवताना दिसत आहे.

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा 'हाऊसफुल 4'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान प्रमोशनसाठी  त्यानं मनिष पॉलचा टीव्ही शो 'मूव्ही मस्ती'मध्ये हजेरी लावली होती. मात्र या ठिकाणी शूटिंग सुरू असताना सेटवर बेशुद्ध झालेल्या एका अभिनेत्याला अक्षय चपळाईनं वाचवलं. ज्यामुळे त्याचा फिटनेस सर्वांना दिसला पण सोबतच त्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

बिग बी म्हणाले, माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा, महिला स्पर्धकाची झाली अशी अवस्था

या शोमध्ये कॉमेडियन अली असगर आणि होस्ट परितोष त्रिपाठी एका अ‍ॅक्टसाठी हारनेसवर लटकले होते. त्यावेळी लटकलेल्या अवस्थेतच परितोष अचानक बेशुद्ध झाला. पण यात समस्या अशा होती की परितोष ज्या ठिकणी लटकला होता त्याठिकाणी पाण्याचा मोठा टँक होता. परितोष अचानक बेशुद्ध झाला हे त्याच्यासोबत हारनेसवर लटकलेल्या अलीला समजलं नाही. तसेच सेटवरील इतर कोणालाही ही गोष्ट लक्षात आली नाही.

लग्नासाठी भारतात आलेल्या निकला उचलावे लागले सिलिंडर, वाचा नक्की काय झालं

Loading...

अक्षयनं असं वाचवलं

परितोष अचानक बेशुद्ध झाला हे त्याच्यासोबत हारनेसवर लटकलेल्या अलीला समजलं नाही. तसेच सेटवरील इतर कोणालाही ही गोष्ट लक्षात आली नाही. त्यामुळे त्याच्या मदतीला कोणी येईपर्यंत अक्षय लगेचच धावत गेला आणि  हारनेसवर लटकलेल्या परितोषला अलगद झेललं. त्यानंतर सेटवरील क्रू मेंबर्सच्या सहाय्यानं बेशुद्ध असलेल्या परितोषला खाली उतरवण्यात आलं. तो पर्यंत हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

उर्वशी रौतेलाने डान्स करता करता स्वतःच उतरवला टॉप VIDEO VIRAL

परितोष हा डान्स रिअलिटी शो 'सुपरस्टार डान्सर'मध्ये मामाच्या भूमिकेत होस्टिंग करताना दिसला होता. तर त्याच्यासोबत हारनेसवर लटकलेला अली असगर कपिल शर्माच्या शोमध्ये दिसतो.

===========================================================

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...