मुंबई 17 जून : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर सामाजिक कामांमुळेही चर्चेत असतो. मग ते मार्शल आर्ट्स शिकवणं असो किंवा पैसे दान करणं असो. अक्षयचा नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग राहिला आहे. तर आता जम्मू आणि काश्मिर (Jammu and Kashmir) मधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याने शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय नुकताच जम्मू - काश्मिर दौरा केला होता तिथे त्याने पॅरामिलिटरी फोर्सेसची (Para military forces) भेट घेतली. तो हॅलिकॉप्टरने तिथे पोहोचला होता. तेव्हा त्याने जवांनाशी संवाद तर साधलाच शिवाय तेथील स्थानिक गावकऱ्यांशीही चर्चा केली. काश्मिरच्या भोंडीपोरा जिल्ह्यात तो गेला होता.
As the country is entering into the 75th year of Independence, @akshaykumar once again comes to meet the #bravehearts guarding the borders.
— BSF Kashmir (@BSF_Kashmir) June 17, 2021
Here he arrives at one of the forward locations of @BSF_Kashmir on #LoC..@BSF_India @PMOIndia @HMOIndia pic.twitter.com/eI7wUj987s
तेथील विद्यार्थ्यांसाठी आता अक्षय शिक्षणाची दारं खुली करत आहे. त्याने तब्बल 1 कोटी रुपये तेथे शाळा उभारण्यासाठी दान केले आहेत. व शाळेच्या नावाला अक्षयच्या वडिलांच नाव देण्यात येणार आहे. हरी ओम भाटीया असं अक्षयच्या वडिलांचं नाव आहे.
50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला सैफ; लेक सारा म्हणाली, ‘आब्बा आप….’यानंतर अक्षयने जवानांसोबत नृत्यही केलं. त्याचे फोटो सोशल मीडिया शेअर करण्यात आले. बी एस एफ काश्मिरच्या सोशल मीडिया हॅन्डलनेही अक्षयसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (Akshay Kumar donated 1 crore)
अक्षयच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय अक्षय त्याच्या आगामी चित्रपटांतही व्यस्त आहे. ‘रामसेतू’, ‘बेल बॉटम’, ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’, ‘सुर्यवंशी’ या चित्रपटांत तो दिसणार आहे.