अक्षय कुमारच्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अवघ्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अक्षय कुमारच्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अवघ्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता अक्षय कुमारचा भाऊ आणि 'कहानी घर घर की' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सचिन कुमार याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • Share this:

मुंबई, 16 मे : अभिनेता अक्षय कुमारचा भाऊ आणि 'कहानी घर घर की' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सचिन कुमार याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे अक्षयच्या कुटुबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सचिन कुमार अक्षयच्या आत्येचा मुलगा होता. वयाच्या 42व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.  शुक्रवारी सकाळी मुंबईतील अंधेरीमध्ये त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.  सचिनच्या अचानक जाण्याने टीव्हीसृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे. राकेश पॉल, चेतन हंसराज, विनीत रैना, सुरभी तिवारी या कलाकारांनी त्याच्या जाण्यामुळे दु:ख व्यक्त केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राकेश पॉल यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'ही बातमी देण्यास अत्यंत दु:ख होत आहे, पण हे खरं आहे. मी त्याला शेवटचं पाहूही शकलो नाही. मला जोपर्यंत त्याच्या जाण्याबद्दल कळलं तोपर्यंत त्याला स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले होते. मला मिळालेल्या माहितीनुसार तो रात्री झोपायला गेला आणि दुसऱ्या दिवशी दारच उघडले नाही. त्याच्या पालकांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी दुसऱ्या चावीने त्यांची खोली उघडली, तेव्हा त्यांना घडला प्रकार लक्षात आला. तो त्याच्या पालकांबरोबरच राहात होता. ही घटना रात्री उशीरा किंवा पहाटे घडली असावी'.

(हे वाचा-आईच्या त्या शब्दांनी मुलाखत सुरू असताना रणवीरला कोसळलं रडू, भावूक VIDEO व्हायरल)

सचिनने काही वर्षांपूर्वी अभिनय करणे सोडले होते. त्यानंतर तो फोटोग्राफर म्हणून काम करत होता. सचिन कुमार याने 'कहानी घर घर की' या मालिकेनंतर 'लज्जा' या मालिकेत देखील काम केले होते. Binaifer Kohli निर्मित मालिकेत त्याने मुख्य नकारात्मक भूमिका साकारली होती.

(हे वाचा-विद्या बालनचा शकुंतला देवी सिनेमा ऑनलाइन रिलीज होणार, कसा पाहायचा जाणून घ्या)

First published: May 16, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या