जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मेरे पेट पे लाथ मत मारो', अक्षय कुमारला का मागावी लागली ट्विंकल खन्नाची जाहीर माफी

'मेरे पेट पे लाथ मत मारो', अक्षय कुमारला का मागावी लागली ट्विंकल खन्नाची जाहीर माफी

'मेरे पेट पे लाथ मत मारो', अक्षय कुमारला का मागावी लागली ट्विंकल खन्नाची जाहीर माफी

बॉलिवूडमध्ये दबदबा असणारा खिलाडी अक्षय कुमारला त्याच्या पत्नीची जाहीर माफी मागण्याची वेळ आली आहे. त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे ट्विटरवर त्याने ट्विंकल खन्नाची माफी माफी मागतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : बॉलिवूडमध्ये दबदबा असणारा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)ला त्याच्या पत्नीची जाहीर माफी मागण्याची वेळ आली आहे. त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे ट्विटरवर त्याने ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)ची माफी माफी मागतली आहे. अक्षयचा चित्रपट ‘पॅडमॅन’ला (Padman) दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्याने सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्याबरोबर फोटो टाकत आनंद व्यक्त केला होता. मात्र हे ट्वीट करताना झालेली एक चूक ट्विंकलच्या लक्षात आली आणि तिला काही ही बाब रुचली नाही. तिने ट्विटरवरच नाराजी व्यक्त केल्यानंतर अक्षय कुमारला ट्विटरवरच तिची जाहीर माफी मागावी लागली.

जाहिरात

अक्षयने केलेल्या या ट्विटवर ट्विंकलने असा रिप्लाय दिला आहे की, ‘तु नक्कीच माझ्या पुढील प्रोडक्शनचा भाग नसणार आहेस’. ट्विंकलने खुलेआम त्याला चित्रपटात घेणार नाही असं सांगितल्यावर अक्षयला माफी तर मागावीच लागली. तर झालं असं की अक्षयने जे पॅडमॅनला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ट्वीट पोस्ट केलं होतं, त्यामध्ये तो चित्रपटाची निर्माता आणि इतर टीमला टॅग करायलाच विसरला. (हे वाचा- ‘सा रे गा मा पा’ स्पर्धक राहिलेल्या गायकाचे मोदींविरोधात अनुचित शब्द, FIR दाखल ) त्याने सोनम आणि राधिकाला यामध्ये टॅग केले होते. ही चूक झाल्यावर ट्विंकलने सोशल मीडियावरच अक्षयचा क्लास घेतला.

ट्विंकलच्या या ट्वीटनंतर अक्षयने त्याची चूक सुधारली आणि हजरजबाबीपणा दाखवत असं ट्वीट केलं की, ‘कृपया माझ्या पोटावर लाथ नको मारूस. चित्रपटाची निर्माता ट्विंकल खन्ना, दिग्दर्शक आर बाल्की आणि ज्यांच्याशिवाय या चित्रपट अपूर्ण आहे ते ए मुरूंगनाथम यांची माफी मागतो’.

जाहिरात

ट्विंकल आणि अक्षय बी टाऊनच्या आवडत्या जोडीपैकी एक आहेत. ट्विंकलने काही वर्षांपूर्वी अभिनय सोडल्यानंतर लेखनास सुरूवात केली आहे तर त्यानंतर तिने चित्रपट निर्मिती करण्याचाही निर्णय घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात