Home /News /entertainment /

‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ कुठे आणि किती रुपयांना पाहाता येईल?

‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ कुठे आणि किती रुपयांना पाहाता येईल?

कंपनीच्या या निर्णयामुळं चाहते नाराज झाले अन् त्यांनी तब्बल चार वर्ष आंदोलन केलं. अखेर चाहत्यांच्या आग्रहाखातर जॅक स्नायडरनं सुपरहिरो चाहत्यांसाठी तयार केलेला खराखुरा जस्टिस लीग प्रदर्शित झाला आहे.

    मुंबई 18 मार्च: बहुचर्चित बहुप्रतिक्षित ‘जस्टिस लीग: द स्नायडर कट’ (Zack Snyder justice league) हा सुपरहिरो चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ला टक्कर देण्यासाठी डीसीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. खरं तर हा चित्रपट 2016 मध्येच प्रदर्शित झाला होता. परंतु त्यावेळी दिग्दर्शक जॅक स्नायडर (Zack Snyder) ऐवजी जॉश विडन यांनं तयार केलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कंपनीच्या या निर्णयामुळं चाहते नाराज झाले अन् त्यांनी तब्बल चार वर्ष आंदोलन केलं. अखेर चाहत्यांच्या आग्रहाखातर जॅक स्नायडरनं सुपरहिरो चाहत्यांसाठी तयार केलेला खराखुरा जस्टिस लीग प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रश्न असा की हा चित्रपट तुम्ही कुठे आणि कसा पाहू शकता? ‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ असं या चित्रपटाला नाव देण्यात आहे. अमेरिका आणि युरोप खंडात हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. परंतु भारतीय प्रेक्षकांना मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवरच समाधान मानावं लागणार आहे. भारतीय प्रेक्षक हा सुपरहिरोपट अ‍ॅपल टीव्ही, बुकमाय शो स्ट्रीम, गुगल प्ले, हंगामा प्ले, टाटा स्काय आणि युट्यूबवर पाहू शकतात. या ठिकाणी हा चित्रपट पाहण्यासाठी जवळपास 150 – 200 रुपये खर्च करावे लागतील. हा चित्रपट चार तासांचा आहे. शिवाय हिंदीमध्ये अद्याप डबिंग केलेलं नाही. तीन महिन्यानंतर या चित्रपटाचं हिंदी वर्जन येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Vanita Kharat New PhotoShoot : मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा झाली BOLD; सोशल मीडियावर वादळ नेमकं हे प्रकरण काय आहे? ‘वॉचमन’, ‘300’, ‘मॅन ऑफ स्टील’, ‘लेजंड ऑफ द गार्डियन’ यांसारख्या अनेक धमाकेदार चित्रपटांची निर्मिती करणारा जॅक स्नायडर हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जॅक अत्यंत आक्रमक शैलीतील अॅक्शनपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याची ही शैली निर्मात्यांना मात्र आवडली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत काम करण्यासाठी ख्रिस्तोफर नोलन यांची निवड केली होती. परंतु नोलन हे अत्यंत वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. अखेर दोघांमधील अंतर्गत मतभेदांमुळे ‘जस्टिस लीग’ ही सीरिज पुर्णपणे फ्लॉप झाली. यामुळं निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान झालं. याच दरम्यान जॅकच्या मुलीचा मृत्यू झाला. परिणामी डिप्रेशनमध्ये गेलेल्या जॅकने डीसी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. डीसीमधून बाहेर पडण्यापूर्वी त्याने ‘जस्टिस लीग’ हा सुपरहिरोपट जवळपास पूर्ण केला होता. परंतु कंपनीने ही कॉपी डब्यात बंद केली. आणि दिग्दर्शक जॉस विडन याच्या मदतीनं पुन्हा एकदा ‘जस्टिस लीग’ तयार केला. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. या प्रकरणामुळे डीसी चाहते नाराज होते. त्यांनी जॅक स्नायडरचा चित्रपट पाहण्याचा आग्रह कंपनीकडे केला. अखेर चार वर्षानंतर जॅकने तयार केलेला चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Hollywood

    पुढील बातम्या