Home /News /entertainment /

Video: अभिनेत्रीनं मोडले लॉकडाउनचे नियम; माजी आमदारासोबत करत होती डान्स

Video: अभिनेत्रीनं मोडले लॉकडाउनचे नियम; माजी आमदारासोबत करत होती डान्स

लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात पोलीस तक्रार दाखल; मास्क न लावता माजी आमदारासोबत करत होती डान्स

    मुंबई 25 एप्रिल: देशभरात कोरोनानं (coronavirus) अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तर रुग्णांची आकडेवारी हजारोंच्या संख्येनं वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना देण्यासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र काही मंडळी या निर्बंधांकडं दुर्लक्ष करुन घराबाहेर पडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshra Singh) हिनं केला. ती तर चक्क मास्क न लावता एका माजी आमदारासोबत नाचताना दिसली. परिणामी तिच्याविरोधात आता पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील माजी आमदार मुन्ना शुक्ला यांनी आपल्या घरी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अक्षरानं देखील हजेरी लावली होती. तिनं कार्यक्रमात जबरदस्त डान्स केला. तिच्यासोबत स्वत: मुन्ना शुक्ला आणि त्यांचे कार्यकर्ता देखील थिरकले. या नाईट पार्टीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये काही पोलीस देखील नाचताना दिसत आहे. परिणामी संतापलेल्या प्रशासनानं या पार्टीत उपस्थित असलेल्या अक्षरासह तब्बल 200 जणांवर कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या सर्व मंडळींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सर्वसामान्य लोक करताना दिसत आहेत. अवश्य पाहा - ‘सेलिब्रिटी असून देखील रुग्णालयात मिळत नव्हता बेड’; फुलवा खामकरनं सांगितला अनुभव अवश्य पाहा - ‘तुझे फोटो पाहून तरुणांना वेड लागेल’; नुसरतला पाहून अभिनेता झाला थक्क गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,160 नवे रुग्ण आढळले असून, 676 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 6 लाख 94 हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत. सर्वाधिक 1 लाख 8 हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई शहरातील नवे रुग्ण आढळण्याची तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. दिवसभरात मुंबई 5888, नाशिक शहर 2875, उर्वरित नाशिक जिल्हा 1881, नगर जिल्हा 3547, जळगाव 941, पुणे शहर 4118, पिंपरी-चिंचवड 2431, उर्वरित पुणे जिल्हा 3476, सातारा 1912, सोलापूर 1778, सांगली 1305, औरंगाबाद जिल्हा 1684, लातूर 1363, यवतमाळ 1427, नागपूर शहर 5417, उर्वरित नागपूर जिल्हा 2616, चंद्रपूर 1742 नवे रुग्ण आढळले. मृतांमध्ये मुंबई 71, ठाणे जिल्हा 26, रायगड 20, नाशिक विभाग 82, पुणे विभाग 94, मराठवाडा 153, विदर्भ 185 जणांचा समावेश आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Coronavirus, Coronavirus cases, Mla

    पुढील बातम्या