जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आमची ही मंडळी पडद्यावर कधीच दिसत नाहीत,पण ..' मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

'आमची ही मंडळी पडद्यावर कधीच दिसत नाहीत,पण ..' मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

'आमची ही मंडळी पडद्यावर कधीच दिसत नाहीत,पण ..' मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावर (Tv) अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर काही जुन्या मालिका निरोप घेत आहेत. यामध्ये मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunahi Barasat Ahe) या मालिकेचाही समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च-   छोट्या पडद्यावर   (Tv)  अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर काही जुन्या मालिका निरोप घेत आहेत. यामध्ये मुक्ता बर्वे   (Mukta Barve)  आणि उमेश कामत   (Umesh Kamat)  यांच्या ‘अजूनही बरसात आहे’   (Ajunahi Barasat Ahe)  या मालिकेचाही समावेश आहे. नुकतंच या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट  (Last Episode)  झाला. त्यामुळे मुक्ता बर्वेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुक्ता बर्वे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपल्या कामाच्या संबंधित अपडेट्स देत असते. अभिनेत्री गेली अनेक महिने ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करत होती. या मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला. दरम्यान अभिनेत्रीने एक हटके पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जाहिरात

मुक्ता बर्वेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक मजेशीर परंतु अत्यंत इमोशनल कॅप्शनसह शेअर केलेला व्हिडीओ आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, ‘शुटींग चा शेवटचा दिवस …, आमच्या पडद्या मागच्या सगळ्या टीम नी इतका सुंदर साजरा केला. सगळे मस्त नटून- थटून, झब्बे घालुन आले होते. एखादा सण आहे असं वाटत होतं’. (हे वाचा: Aai Kuthe Kay Karte: ईशाने आशुतोषला दिला अरुंधतीपासून दूर राहण्याचा इशारा ) अभिनेत्रीने पुढे लिहिलंय, ‘‘आमची ही मंडळी पडद्यावर कधीच दिसत नाहीत. पण ही सगळीजणं आहेत म्हणूनच आम्ही तुम्हाला दिसु शकतो. iris production च्या सगळ्या टीम ला खूप प्रेम आणि मनापासून thanks ( आपल्या सगळ्या टीम ची insta handles माहीत नाहीयेत त्यामुळे सगळ्यांना tag करु शकले नाही.) आज सिरियल चा शेवटचा भाग टेलीकास्ट झाला. प्रेक्षक म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप मनापासून आभार’’. असं म्हणत अभिनेत्रीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून मुक्ता बर्वे आणि उमेश कामतने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात