मुंबई, 12 मार्च- ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता असते. सध्या मालिकेमध्ये आशुतोष आणि अरुंधती यांची आगळीवेगळी केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अरुंधतीची (Arundhati) मुलगी ईशा चक्क आशुतोष (Ashutosh) जवळ जाऊन आपल्या आईपासून दूर राहण्याची विनंती करताना दिसून येत आहे. स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. अरुंधीत नुकतीच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. नवीन घर शोधून देण्यापासून ते घरात शिफ्ट होण्यापर्यंत सगळी मदत तिचा मित्र आशुतोष याने केलीय. आशुतोषचा अरुंधतीच्या आतापर्यंतच्या प्रवासात मोठा सहभाग आहे. मित्र म्हणून नेहमीच्या तिच्या चांगल्या व वाईट काळात तो तिच्यासोबत उभा राहिला आहे. आशुतोषच्या मनात अरुंधतीबद्दल प्रेमाची भावना आहे. परंतु अरुंधती त्याला फक्त आपला चांगला मित्र समजते. ही गोष्ट अरुंधतीने नुकतंच आशुतोष समोर स्पष्ट केली आहे.
दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो फारच रंजक वाटत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि अनिरुद्धची मुलगी ईशा आशुतोषजवळ जाऊन आपल्या आईपासून दूर राहण्याची विनंती करत आहे. या प्रोमोमध्ये ईशा आशुतोषला म्हणते, ‘मला माहिती आहे तुमहाला माझे बाबा आवडत नाहीत. अलीकडे ते अनेकांना आवडत नाहीत. मला माहितेय माझी आई आणि बाबा कधीही एकत्र येणार नाहीत. पण मला माझ्या आईला दुसऱ्या कुणासोबत पाहायचा विचारसुद्धा मला सहन होत नाही. त्यांनतर आशुतोष ईशाला अरुंधती जवळ घेऊन येतो. आणि ईशा आपल्या आईला जाऊन घट्ट मिठी मारते’. (हे वाचा: सुंदरा..’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, तापसी पन्नूसोबत केलंय काम ) असा हा रंजक प्रोमो सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे अरुंधतीचा मुलगा यश या अरुंधती आणि आशुतोषला एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे ईशा त्यांना दूर ठेवण्यासाठी धडपडत आहे. आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्याचं नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

)







