मुंबई, 19 नोव्हेंबर- ‘अजूनही बरसात आहे’ (Ajun hi Barsat Ahe ) या मालिकेतून (Marathi serial) अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta barve) ही जोडी प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. मालिकेतील दोघांमध्ये सतत वाद तर कधी प्रेम पाहायला मिळत असतो. या दोघांनी एकत्र यावे, लवकर लग्नगाठ बांधावी अशीच चाहत्यांची इच्छा होती. आणि आज ही इच्छा पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.
नुकताच राजश्री मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मुक्ता बर्वे अर्थातच मीराचा एक व्हिडीओ (VIEDO) शेअर केला आहे. यामध्ये ती नटून-थटून अगदी नवरीच्या गेटअपमध्ये तयार झाली आहे. पारंपरिक नऊवारी साडी, हातात शाल, डोक्यावर मुंडोळ्या आणि चेहऱ्यावर अप्रतिम हास्य अशी आज मीरा तयार झाली आहे. नवरीच्या रूपात मीरा फारच सुंदर दिसत आहे. मालिकेत लवकरच आदिराज आणि मीरा लग्नगाठ बांधणार आहेत. अनेक दिवसांपासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता होती. आज अखेर मालिकेत हे क्षण पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये मीरा फारच आनंदी दिसून येत आहे. मात्र आदिराजचा लूक अजूनही समोर आलेला नाही. मीरा आणि आदिराजला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. मीरा आणि आदिराज यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत. सुरुवातीला प्रेम, रिलेशनशिप नंतर ब्रेकअप आणि नंतर पुन्हा एकदा पॅचअप असा यांचा प्रवास आहे. एकेमकांपासून वेगळे होऊन देखील त्यांच्या मनात एकेमकांबद्दल प्रेम तसंच होतं. आणि म्हणूनच नशिबाच्या साथीने आज हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. एकमेकांच्या सोबतीने मीरा आणि आदिराज आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. मालिकेतील हा नवा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर झाले आहेत. मुक्त आणि उमेशची जोडी प्रचंड पसंत केली जात आहे. **(हे वाचा:** ‘तू सेम प्रियांका चोप्रा’ धनश्रीच्या वेस्टर्न LOOKवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स ) जुलैमध्ये सोनी मराठीवर ही मालिका सर्वांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे दोघेही मराठीतील एक उत्तम कलाकार आहेत. दोघांनीही आपल्या अभिनयाने आपला एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर परतलेलं बघून चाहते जाम खुश आहेत. त्यामुळे या दोघांनाही चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.