मुंबई, 20 नोव्हेंबर: हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 2' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'दृश्यम 2' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'दृश्यम 2' ने दोन दिवसांत सिद्ध केले आहे की या चित्रपटाचा या वर्षातील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत समावेश होणार आहे. अजय देवगण आणि तब्बू स्टारर या चित्रपटाची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी झाला आहे
पहिल्याच दिवशी 'दृश्यम 2' चित्रपटाने बंपर कमाई केली. विजय साळगावकर 7 वर्षांनंतर परतल्यानंतरही त्यांच्याबद्दलची एकेक गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आहे. प्रेक्षक त्याला विसरलेले नाहीत. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दुसरीकडे, अजय देवगणच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 20-21 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत आता सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 2' च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 35-36 कोटींचा आकडा पार केला आहे.
View this post on Instagram
कलेक्शनवर नजर टाकली तर शुक्रवारच्या आकडेवारीनुसार शनिवारी चित्रपटाने ४५ टक्क्यांनी अधिक व्यवसाय केला आहे. दिवसेंदिवस सिनेमा हॉल भरून जात असल्याची परिस्थिती आहे. तिकीट कधी मिळणार आणि चित्रपट बघायला कधी जाणार, याची लोक वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांनी चाहत्यांमध्ये एका चित्रपटाची अशी क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे निर्मात्यांच्या आनंदाला थारा नाही.
'दृश्यम 2' ने पहिल्याच दिवशी 'भूल भुलैया 2' आणि 'गंगूबाई काठियावाडी' सारख्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला. विश्लेषकांच्या मते हा चित्रपट हिट होण्याच्या मार्गावर आहे. तथापि, आठवड्याच्या दिवसातील चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल. त्यामुळे येत्या दिवसांत चित्रपट काय कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Bollywood, Bollywood News, Entertainment