लोणावळा, 10 जून- बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या आठवड्यात कोणालाही एलिमिनेट केलं नव्हतं. मात्र दुसऱ्या आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर जाणार हे निश्चित होतं. पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, वीणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे यांच्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. अखेर या स्पर्धेतून मैथिली जावकरला कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर जावं लागलं.
मैथिलीच्या चाहत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. आपल्या बिग बॉसच्या घरातील दोन आठवड्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना मैथिली म्हणाली की, ‘या घरात कोणंच कोणाचं ऐकत नाही. इथे सारेच उद्धट, उर्मट आहेत. मी खूप एन्जॉय केलं. घरातला अनुभव कधीही न विसरता येईल असाच होता. नेहा सोडून सगळ्यांशीच माझी चांगली मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवनने मला थोरली बहीण मानली. मला या घरात दोन भाऊ मिळाले.’
दरम्यान, विकेण्डचा वारमध्ये महेश मांजरेकरांनी सुरेखाजींना अभिजीत बिचुकलेला काही प्रश्न इंग्रजीमध्ये विचारण्यास सांगितले आणि त्यावरून घरात एकच हशा पिकला होता. पूर्ण आठवड्यात कोणामुळे घरातील तापमान वाढले असा प्रश्न विचारला असता स्पर्धकांनी विणा आणि शिवानीचं नाव घेतलं. यामुळेच दोघींना एक टास्क पार पडला. यात महेश यांनी घरच्यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्नांवर ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली त्यांच्यावर थंड पाण्याचा वर्षाव झाला.
विणाला महेश मांजरेकरांनी ती कुठे चुकते ते सांगितले तर शिवानीला कठोर शब्दांमध्ये खडसावले. शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या, गेम न खेळण्यास आणि बिग बॉस यांनी दिलेली शिक्षा म्हणजेच अडगळीच्या खोलीत रहाण्यास नकार देणे, परागशी तिचे असलेले वागणे या सगळ्यावर महेश मांजरेकरांनी शिवानीला खडे बोल सुनावले. अशा प्रकारची वागणूक इथे सहन नाही करणार, तुझ्या रागावर ताबा ठेव असे देखील तिला सांगितले.
VIDEO : पुण्यात मुसळधार; अनेक रस्त्यांवर साचलं पाणी