VIDEO- आजोबांच्या आठवणीत ढसाढसा रडली न्यासा देवगण, बाबांनी असे सावरले

VIDEO- आजोबांच्या आठवणीत ढसाढसा रडली न्यासा देवगण, बाबांनी असे सावरले

सासऱ्यांच्या जाण्याचं दुःख काजोलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. प्रार्थना सभेतही तिच्या चेहऱ्यावरची उदासी कोणापासून लपली नाही.

  • Share this:

मुंबई, 31 मे- देवगण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजयचे वडील वीरू देवगण यांच्या शोकसभेला पूर्ण देवगण कुटुंब उपस्थित होतं. आजोबांच्या शोकसभेत नात न्यासा फार भावुक झाली होती. गुरुवारी आयोजित केलेल्या शोकसभेत आजोबांच्या आठवणीत न्यासा रडताना दिसली. यावेळी अजय तिचं सांत्वन करतानाही दिसला. तिचे हेच फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या न्यासा सिंगापूरमध्ये तिचं शिक्षण घेत आहे. अजयचा मुलगा युग मात्र या प्रार्थना सभेत दिसला नाही. २७ मे रोजी वीरू देवगण यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. सासऱ्यांच्या जाण्याचं दुःख काजोलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. प्रार्थना सभेतही तिच्या चेहऱ्यावरची उदासी कोणापासून लपली नाही. शोकसभेत अनेक बॉलिवूड कलाकार अजय आणि काजोलचं सांत्वन करायला पोहोचले होते. यात चंकी पांडे, महिमा चौधरी, कबीर बेदी, सैफ अली खान, सलमान खान यांसारखे अनेक कलाकार मंडळी आपल्या मित्राच्या दुःखात सहभागी झाले होते.

अजयच्या वडिलांच्या चितेसमोर असे बसून होते अमिताभ बच्चन, लिहिली भावुक पोस्ट

 

View this post on Instagram

 

@ajaydevgn and @nysadevgan today for Prayer Meet of Respected VEERU DEVGAN SIR . #veerudevgan #condolences #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

‘या’ आजाराने त्रस्त होत्या तनुजा, करावी लागली सर्जरी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वीरु यांच्या निधनाला 24 तास उलटून गेल्यानंतर अजय आणि काजोल यांची लेक न्यासा वांद्रे येथीस एका सलूनमध्ये आपल्या मैत्रींसोबत मजा-मस्ती करताना दिसली. तिच्या या कृतीमुळे नेटकरांनी तिची चांगलीच शाळा घेतली होती. एकीकीडे बॉलिवूडचे स्टार अजय आणि काजोल यांचे सांतवन करत असताना, त्यांची लेक बाहेर हसताना आणि खिदळताना दिसली. त्यामुळे चहूबाजूंनी तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. अजय आणि काजोल आपल्या मुलांसोबत कॅमेरासमोर जास्त येत नाहीत. मात्र न्यासाचा हा अवतार पाहून अजय आणि काजोलही तिच्यावर रागवले असतील यात काही शंका नाही. न्यासाचे हसतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात गर्दीत अडकल्या आशा भोसले, स्मृती इराणींनी अशी केली मदत

अजय यांचे वडिल वीरु देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे. याशिवाय ‘हिंदुस्तान की कसम’ नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. फक्त अ‍ॅक्शन आणि दिग्दर्शनच नाही तर वीरू यांनी अभिनेता म्हणूनही अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘क्रांती’ (१९८१), ‘सौरभ’ (१९७९) आणि ‘सिंहासन’ (१९८६) या सिनेमांत त्यांनी अभिनयही केला होता. अ‍ॅक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचे ‘फूल और कांटे’, ‘हिम्मतवाला’, ‘प्रेम रोग’, ‘क्रांती’, ‘दो और दो पांच’ हे सिनेमे तुफान गाजले होते.

कपिल शर्मापासून कंगना रणौतपर्यंत या कलाकारांनी लावली मोदींच्या शपथ ग्रहणाला हजेरी

वीरू यांना पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जाणं फारसं पसंत नव्हतं. कामाव्यतिरिक्त ते घरत राहणं जास्त पसंत करायचे. त्यांना अजयच्या ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या स्क्रीनिंगला शेवटचं पाहण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत सातत्याने खालवत होती. यामुळे अजय देवगणने ‘दे दे प्यार दे’ सिनेमाचं प्रमोशन अर्ध्यावर सोडलं होतं. यानंतर त्याने संपूर्ण वेळ वडिलांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता.

VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ

First published: May 31, 2019, 12:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या