मुंबई, ३१ मे- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्या कुटुंबावर एकामागोमाग एक संकट येत आहेत. २७ जुलैला अजयच्या वडिलांचं वीरू देवगण यांचं निधन झालं. त्याच दिवशी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी देवगण कुटुंबाच्या दुःखात सहभागी होती. वीरू यांच्या जाण्याच्या दुःखातून कुटुंब स्वतःला सावरत होतं तिथे दुसऱ्याच दिवशी अजून एक वाईट बातमी समोर आली. काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तनुजा यांच्यवर डायवर्टीकुलिटिसची सर्जरी करण्यात आली. यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे.
७५ वर्षीय तनुजा यांना मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, तनुजा यांना किमान एक आठवडा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. डायवर्टीकुलिटिस हा एक पोटाशी निगडीत आजार आहे. दरम्यान, काजोल नियमितपणे आपल्या आईला भेटायला रुग्णालयात जाताना दिसते. तनुजा यांनी ज्वेल थीफ, हाथी मेरे साथी, दो चोर यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय पितृऋण या मराठी सिनेमामधील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ