मुंबई, 24 जुलै : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्याप्रमाणेच स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. ऐश्वर्याबरोबर बऱ्याचदा तिची मुलगी आराध्याही असते. या मायलेकींचे एअरपोर्ट लूक्स खूपदा चर्चेत असतात. नुकतंच ज्युनिअर बच्चन कुटुंब म्हणजे अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या एअरपोर्टवर दिसले. या वेळी या तिघांच्या लूकने लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्याचे कपडे, बॅग्ज, हिल्स यांच्या किमतीची चाहत्यांमध्ये चर्चा असते. पण या वेळी आराध्याची बॅग व तिच्या किमतीबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. आराध्याने एअरपोर्टवर कॅरी केलेल्या बॅगच्या किंमतीत तुमची एखादी परदेशवारी होऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. तर आराध्याच्या या बॅगमध्ये काय खास आहे आणि तिची किंमत किती आहे, ते जाणून घेऊयात. ज्युनिअर बच्चन कुटुंबीय आणि त्यांची स्टाइल ज्युनिअर बच्चन अभिषेकच्या कुटुंबाने प्रवासात खूपच कंफर्टेबल कपडे घातले होते. आराध्याने जीन्स, टॉप आणि जॅकेट घातलं होतं, हे सर्व पेस्टल कलर टोनचे होते. तर, ऐश्वर्या पूर्ण ब्लॅक रंगाच्या कपड्यांमध्ये सुंदर दिसत होती. अभिषेक जीन्स, टी शर्ट आणि डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातली होती. हेही वाचा - अनिल कपूरच्या कपड्यांवर जळायचा सलमान खान? बिल पाहून बसला होता शॉक म्हणाला, माझ्या करिअर… आराध्याने कोणते कपडे घातले होते? आराध्याने लाइट ब्लू रंगाची स्ट्रेट कट जीन्स घातली होती. तिने त्यावर टी-शर्ट घातला होता आणि नंतर त्यावर गॅप ब्रँडचे जॅकेट घातले होते. आराध्याने मल्टिकलर्सचे स्नीकर्स घातले होते. तिने केसांना हेअरबँड लावला होता आणि बाकी केस मोकळे सोडले होते. मेसी हेअरमध्ये आराध्या खूपच क्युट दिसत होती.
आराध्याच्या पाठीवर महागड्या ब्रँडची बॅग ऐश्वर्या-अभिषेकसोबत परतलेल्या आराध्याच्या खांद्यावर एक बॅकपॅक होती, जी जगातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी ब्रँडपैकी एक गुच्ची मधून खरेदी केलेली दिसली. त्यावर ओव्हरऑल लोगो प्रिंट आणि पिवळे स्टार्स होते. त्यावरील स्ट्रॅप्स, झिप आणि साइड पोर्शनदेखील पिवळे होते. बॅगेची किंमत लाखात इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, आराध्या बच्चनच्या खांद्यावर जी क्युट बॅग होती तिची किंमत सुमारे 1652 डॉलर आहे. भारतीय चलनात त्याचं रूपांतर केल्यास ही किंमत सुमारे 1,35,448 रुपये आहे. एवढ्या रुपयांत एखाद्या व्यक्तीची परदेशात छोटीशी ट्रिप सहज होऊ शकते. सोशील मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहे.