मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ponniyin Selvan मधील Aishwarya Rai Bachchan चा लूक लीक; पाहताच चाहत्यांना आतुरता वाढली

Ponniyin Selvan मधील Aishwarya Rai Bachchan चा लूक लीक; पाहताच चाहत्यांना आतुरता वाढली

ऐश्वर्या चाळिशीतही ब्युटी क्वीनचं सौंदर्य टिकवूनआहे.

ऐश्वर्या चाळिशीतही ब्युटी क्वीनचं सौंदर्य टिकवूनआहे.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya rai bachchan) तिच्या आगामी ‘पोन्नियन सेलवन’ (Ponniyin Selvan) फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

isनवी दिल्ली : बॉलिवूडमधील (Bollywood) सुंदर अभिनेत्री अशी ओळख असेलली ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai- Bachchan) ही नेहमीच लूक, फॅशन आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिची ग्लॅमरस भूमिका (Glamorous Role) हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कॅमेरांच्या झगमगाटापासून काहीशी दूर राहणारी ऐश्वर्या जेव्हा कधी दृष्टीस पडते तेव्हा तिच्या लूकपासून ते ड्रेस-मेकअपपर्यंत सर्वच गोष्टींवर चर्चा होते. गेल्या काही काळापासून तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसल्याने तशी ती चर्चांपासून थोडीशी दूरच आहे. परंतु, आता तिच्या फॅन्सला नव्या चित्रपटाची प्रतीक्षा मात्र आहे आणि तिच्या अशाच आगामी फिल्ममधील तिचा लूक लीक झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय -बच्चन तिच्या आगामी ‘पोन्नियन सेलवन’ (Ponniyin Selvan) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘बॉम्बे’, ‘दिल से’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे मणिरत्नम (Mani Ratnam) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी देखील मणिरत्नम आणि ऐश्वर्या राय यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहे.

‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण (Shooting) सुरू असून, या चित्रपटाचा एक लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. यात ऐश्वर्याचा पेहराव पाहता, ती या चित्रपटात एखाद्या राजघराण्यातील (Royal Family) व्यक्तीची भूमिका करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हे वाचा - Prakash Raj यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ, वयाच्या 56व्या वर्षी केलं लग्न

ऐश्वर्याने लाल रंगाची साडी आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने परिधान केल्याचे दिसत आहे. या दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, कानात मोठ्या आकाराच्या रिंगांसह अनेक आभूषणं ऐश्वर्याने परिधान केल्याचे या लीक झालेल्या छायाचित्रात दिसत आहे. या छायाचित्रात ऐश्वर्या राय एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. यावरुन चित्रपटातील तिची भूमिका ही एखाद्या राजघराण्यातील व्यक्तीची किंवा महाराणीची असावी, असे स्पष्ट होते.

हे वाचा - Bigg Boss OTT: अभिनेता राकेश बापट शमिता शेट्टीच्या प्रेमात?, म्हणतो की...

या लूकने चित्रपट (Cinema) रसिक आणि ऐश्वर्याच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या लीक झालेल्या छायाचित्रात केवळ ऐश्वर्याच नाही तर या चित्रपटाची पूर्ण टीम तिच्या आसपास असल्याचे दिसत आहे. एक मोठा बूम माईक असून, त्यावर ऐश्वर्या बोलताना दिसत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी अशा दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे.

First published:

Tags: Aishwarya rai, Entertainment