मुंबई, 25 ऑगस्ट: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. या शोच्या प्रत्येक सीझनला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं आहे. सध्या 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) मध्ये तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून बिग बॉस ओटीटीच्या घरात अनेक नवीन गोष्टी घडत आहेत.
प्रतीक सहजपाल याला नेहा भसीन हिने आपला नवीन जोडीदार म्हणून निवडले आहे. तर, दुसरीकडे शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिने तिचा जुना जोडीदार राकेश बापट (Raqesh Bapat) सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉसच्या घरात शमिता ही सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये राहिली आहे. आजकाल तर शमिता शेट्टी व राकेश बापट या दोघांच्या जोडीविषयी घरामध्ये खुपच जास्त चर्चा केली जात आहे.
शो च्या पहिल्या आठवड्यात राकेश आणि शमिता शेट्टी एकमेकांशी जास्त कनेक्ट झाले नव्हते. शमिता शेट्टीने नुकतेच तसे सांगितले होते. पण जसजसा शो पुढे गेला, तसतसं तिला राकेशचा सहवास आवडू लागला. हळूहळू दोघांमधील कनेक्शन आणि बाँडिंग चांगलं होत गेलं असंही तिनी सांगितलं होतं. आठवड्याच्या सुरुवातीला या गेम शोमधील पद्धतीनुसार शमिताकडून हार्ट स्वीकारताना राकेशनी भावना व्यक्त केल्या होत्या. तो म्हणाला, ‘माझ्याबरोबर माझ्या जवळची माणसं नेहमी असवीत असं वाटतं, शमिता मला खूप चांगली वाटते आणि मी तिच्यासोबत राहताना आपुलकी वाटते त्यामुळे मला तिच्यासोबत राहायला आवडेल.’
View this post on Instagram
बिग बॉस ओटीटीमध्ये 17 व्या दिवसाची (Bigg Boss Day 17) सुरुवात रोमान्सने झाली. दिवसाच्या सुरुवातीला, राकेश बापटने शमिता शेट्टीला मॉर्निंग किस करीत सकाळी उठवले. गेल्या काही दिवसांपासून राकेश शमिताची खूप काळजी घेताना दिसत आहे. राकेश आणि शमिताच्या स्टाँग होत असलेल्या बाँडिंगबाबत इतर स्पर्धक चर्चा करताना दिसत आहेत. तर, राकेश आणि शमिता सध्या एकमेकांच्या मैत्रीचा आनंद घेत आहेत. दोघांमधील हे कनेक्शन किती दिवस चालतं, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
नुसरत जहाँच्या घरी येणार नवा पाहुणा; मुलाच्या जन्मावेळी ही खास व्यक्ती असणार सोबत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Big boss, Bigg Boss OTT, Bollywood actor, Bollywood actress