मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Prakash Raj यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ, वयाच्या 56व्या वर्षी केलं लग्न; Photos Viral

Prakash Raj यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ, वयाच्या 56व्या वर्षी केलं लग्न; Photos Viral

मोठ्या पडद्यावर अनेकदा व्हिलन साकारणारे प्रकाश राज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच रोमँटिक आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाची 11 वर्ष अत्यंत खास पद्धतीने साजरी केली आहेत

मुंबई, 25 ऑगस्ट: अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) त्यांच्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जातात. शिवाय त्यांची विविध वक्तव्य देखील नेहमी चर्चेत असतात. वाँटेड, सिंघम या बॉलिवूड सिनेमांतील भूमिका त्यांच्या गाजल्या. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तर त्यांना विशेष मान आहे. दरम्यान मोठ्या पडद्यावर अनेकदा व्हिलन साकारणारे प्रकाश राज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच रोमँटिक आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाची 11 वर्ष अत्यंत खास पद्धतीने साजरी केली. अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांची पत्नी पोनी वर्मा यांच्याशी पुन्हा एकदा लग्न (Actor Prakash Raj Married Again) केलं. त्यांच्या मुलासाठी या दाम्पत्याने पुन्हा एकदा लग्न केलं असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

प्रकाश राज यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आम्ही आज पुन्हा एकदा लग्न केलं कारण आमचा मुलगा वेदांतला आमच्या लग्नाचा साक्षीदार व्हायचं होतं.

प्रकाश राज यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी यामध्ये त्यांच्या लग्नाचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'It turned out so right.. for strangers in the night.. खूप कमाल मैत्रिण बनण्यासाठी, प्रेमिका आणि आयुष्यात सहप्रवासी बनण्यासाठी... माझ्या लाडक्या बायकोचे धन्यवाद.. #happyweddinganniversary'

प्रकाश राज आणि पोनी यांनी 2010 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांची भेट देखील एका चित्रपटाच्या सेटवरच झाली होती, ज्यावेळी पोनी एक गाण्याचं नृत्यदिग्दर्शन करत होत्या. प्रकाश यांचा हा दुसरा विवाह आहे, ते पहिली पत्नी लतिका कुमारी यांच्यापासून 2009 मध्ये विभक्त झाले होते.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor