मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फॅन्सनं अभिषेककडे केली ऐश्वर्याविरोधात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

फॅन्सनं अभिषेककडे केली ऐश्वर्याविरोधात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai Bachchan

साऊथ अभिनेता विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai ) यांची प्रमुख भूमिका असलेला 'पोनियान सेलवन-1' (Ponniyin Selvan-1)ची रिलीज रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई, 6 मार्च: साऊथ अभिनेता विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai ) यांची प्रमुख भूमिका असलेला 'पोनियान सेलवन-1' (Ponniyin Selvan-1)ची रिलीज रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटामुळे ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत आली आहे. 2018 मध्ये ‘फन्ने खां’ रिलीज झाला आणि तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावर झळकलीच नाही. पण अखेर ती प्रेक्षकांच्या भेटीस परत येत आहे. दरम्यान, एका चाहत्याने तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चनकडे(Abhishek Bachchan) तिच्याविरोधात तक्रार केली आहे. तिला आमची काळजी नसल्याचे चाहत्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऐश्वर्या इतर सेलेब्सप्रमाणे सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नसते. स्पेशल ओकेजनलाच ती पोस्ट करते. मात्र, तिचा अपकमिंग चित्रपट 'पोनियान सेलवन-1' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. त्यानंतर तिने कोणतिही पोस्ट शेअर केली नाही. एक असा चाहता आहे. तो तिच्या आगामी पोस्टचा वाट पाहत होता. मात्र, चित्रपटाच्या घोषणेनंतर तिने एकही पोस्ट केली नाही. इतकेच नव्हे तर ती फारशी अॅक्टीव्हदेखील नाही.

तिची ही गोष्ट ऐश्वर्याच्या चाहत्यांला पटली नाही. त्याने थेट ट्विट करत आपली व्यथा व्यक्त केली आणि तिच्याविरोधात तक्रार केली.

अॅश इन्स्टा पाहत नाही, म्हणून चाहत्याने दुसरा मार्ग स्वीकारला आणि ऐश्वर्याचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनला मेसेज करण्यासाठी कन्वेन्स केले आहे.

मला आता ऐश्वर्या किंवा तिच्या टीमकडून कोणतीही आशा नाही, कारण गेल्या 10 वर्षांत यांच्यापैकी कोणीही एकाने इच्छा पूर्ण केलेली नाही. अशा परिस्थितीत मी तुम्हाला अभिषेक बच्चन विनंती करतो.

आता 10 वर्षांनंतर ऐश्वर्याने चित्रपट साइन केला आहे. मात्र, ती नेहमी सक्रिय नसते. आमच्या संपर्कात नसते. इतक्या वर्षांनी तिचा चित्रपट येत आहे  म्हणजे आमची तिला काळजी नाही. अशा आशयाची पोस्ट युजरने ट्विटवर केली आहे. तसेच,सोशल मीडियाला कमी महत्त्व देते. लाइक्सची पर्वा करत नाही, आम्ही देखील त्याचा आदर करतो, परंतु हा तिचा चित्रपट आहे, ज्याची आम्ही 3 वर्षांपासून वाट पाहत आहोत. असे सांगत त्या युजरने अभिषेक बच्चनला टॅग केले आहे.

त्याच्या या पोस्टमधून हा युजर अॅशचा जबरा फॅन असल्याची चर्चा रंगली आहे.

मणिरत्नम (Mani ratnam) यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ (Ponniyin Selvan-1) या चित्रपटातून ऐश्वर्या कमबॅक करतेय. चित्रपटाची रिलीज डेटही आलीये आणि सिनेमातील ऐशचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. तिचा लूक दमदार आहे. भरजरी वस्त्र, अंगावर सुंदर दागिणे, माथ्यावर कुंकू असा तिचा लुक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First published:

Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Bollywood actress, Bollywood News