मुंबई, 31 ऑक्टोबर: छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरत असलेली ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या पायावर कणखरपणे उभी राहिलेल्या अरुंधतीचा (arundhati new look ) नवनवा लुक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चाहत्यांना तिला मालिकेमध्ये नव्या लूकमध्ये कधी पाहता येणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, अरुंधती म्हणजेच, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने या गोष्टीची गंभीर दखल घेत सोशल मीडियावर सुरु असलेल्या नव्या लूकच्या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ही मालिका रंजक वळणार पोहचली आहे. घर गहाण ठेवण्याचा प्रकरणामुळे अरुंधती एकटी पडली आहे. तिला आता साथ देण्यासाठी मालिकेत आता एका नव्या पात्रची एन्ट्री होणार आहे. अशातच अरुंधती नव्या रुपात दिसणार या चर्चेने जोर धरला आहे. मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध च्या घट;स्फोटाच्या सीननंतर अरुंधती एका नव्या रुपात दिसणार या चर्चेने जोर धरला आहे. मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध च्या घट;स्फोटाच्या सीनदरम्यान, अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने आपल्या इंस्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आणि हा आहे अरुंधतीचा नवा लुक या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले. यासर्वाची गंभीर दखल घेत, मधुराणीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तीने जीन्स परिधान केली असून मॉडर्न लूक शेअर केला आणि हा आहे अरुंधतीचा नवा लुक असे सांगितले. पण ‘अशा अफवांवर विश्वास ठेवू नका’ असे म्हटले आहे.
याचा अर्थ असा आहे की, रोज सुरु असणाऱ्या तिच्या नव्या लूकच्या चर्चेला तिने पुर्णविराम द्यायचा ठरवला आहे. एरव्ही पडद्यावर एक वेळी आणि साधी साडी नेसून वावरताना दिसणारी ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रत्यक्ष आयुशाय्त मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला अभिनेत्रीनी अनेक फोटोशूट केले आहेत. ज्यातील काही फोटो सध्या खूप चर्चेत आले आहेत.