Home /News /entertainment /

ऐश्वर्या राय-बच्चन 'या' सिनेमातून करणार सुपरस्टार रजनीकांतबरोबर कमबॅक

ऐश्वर्या राय-बच्चन 'या' सिनेमातून करणार सुपरस्टार रजनीकांतबरोबर कमबॅक

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan)सध्या बरीच चर्चेत आहेत. कान्स चित्र महोत्सवामध्ये ऍश दिसल्यानंतर तिच्याबद्दल बरीच चर्चा झाली. असिहवर्य सिल्वर स्क्रीनपासून अनेक दिवस गायब आहे. पण आता तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळेल याबद्दल शंका नाही.

पुढे वाचा ...
  मुंबई 7 जून: अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे बातम्यांमध्ये झळकत आहे. ऍश कान्स चित्रपट महोत्सवापासून सतत चर्चेत येत आहे. आपल्या करिअरमध्ये लक्षणीय कामगिरी दाखवलेल्या ऐश्वर्याचं साऊथमध्ये पुनरागमन होणार अशा चर्चा होत असताना आता एक खूप मोठी माहिती समोर आली आहे.नेमकं काय आहे कारण?  ऐश्वर्या साऊथ इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार अशा शक्यता गेले अनेक महिने वर्तवल्या जात आहेत. मणी रत्नम दिग्दर्शित पीएस भाग 1 या चित्रपटात ती झळकणार असल्याचं मागच्या महिन्यात समोर आलं होतं. ऐश्वर्या गेली चार वर्ष मोठ्या स्क्रीनवर झळकली नाहीये. पण आता तिच्या चाहत्यांना खूप मोठा सुखद धक्का बसणार आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्या ‘थलैवर 169’ (Thalaivar 169) या चित्रपटात ऐश्वर्या सुपरस्टार रजनीकांत (Aishwarya Rai Bachchan-Rajnikanth) यांच्यासोबत लीड रोलमध्ये दिसणार आहे. या माहितीवर आता अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. ऐश्वर्या आणि रजनीकांत ही अफलातून जोडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने फॅन्सना मोठं सरप्राईज मिळालं आहे. आता ही जोडी काय धमाल करणार हे पाहण्यासारखं असेल.  ऍश आणि रजनीकांत ही जोडी तशी बरीच पसंत केली जाणारी ऑन स्क्रीन जोडी आहे. त्यांच्या रोबोट या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. तब्ब्ल १२ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका करणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता येणाऱ्या चित्रपटात काय बघायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन, प्रियांका अरुल मोहन यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत अशी माहिती समोर येत आहे.
  या चित्रपटासाठी ऐश्वर्याने तारख्या दिल्याचं समजत आहे आणि शूट ऑगस्टमध्ये सुरु होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. ऐश्वर्याने अचानक करिअरमधून ब्रेक घेतला होता. फँन खान चित्रपटानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टचा भाग नव्हती. या बातमीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  हे ही वाचा'सैराट'ची आर्ची करणार दीपिकाची कॉपी! 'या' अभिनेत्रींनीही साकारलीय प्रोस्थेटिक मेकअपसह दमदार भूमिका ऐश्वर्या नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.  तिच्या एकाहून एक लुकची चर्चा होत होती. पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या या अभिनेत्रीचं सौंदर्य आजही टिकून आहे. ऐश्वर्या नुकत्याच झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात नवरा अभिषेक याच्यासोबत बिनधास्त डान्स करताना सुद्धा दिसली होती. बच्चन कुटुंबीयांचा हा विडिओ खूप viral झाला होता. 
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Aishwarya rai, Bollywood News, Rajnikant, Superstar rajnikant

  पुढील बातम्या