जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / महात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार

महात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार

महात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार

महात्मा गांधींच्या आयुष्यावर तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीला मिळाला सर्वोत्कृष चित्रपटाचा पुरस्कार

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 जून**:** गांधीजी म्हटलं कि सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह हे तीन शब्द आठवतात. (Mahatma Gandhi) महात्मा गांधींनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवला. स्वातंत्र्य लढ्यात संपूर्ण देशाला इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे गांधी एक करिश्माई व्यक्तिमत्व होतं असं म्हणतात. (Mahatma Gandhi movements) त्यामुळंच त्यांचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर जगात पाहायला मिळतो. अन् याचच एक उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये (New York Film Festival) पाहायला मिळालं. Yoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अहिंसा-गांधी: द पावर ऑफ द पावरलेस’ (Ahimsa-Gandhi: The Power of the Powerless) या डॉक्युमेंट्रीनं सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म या विभागात एकापेक्षा एक फिल्मला नामांकन मिळालं होतं. परंतु त्या सर्वांवर मात करत गांधीजींच्या फिल्मनं पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. रमेश शर्मा यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. व त्यांनीच दिग्दर्शन देखील केलं होतं. गांधींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी या फिल्मची निर्मिती केली होती. त्यांची तत्व, त्यांनी अहिंसेच्या मार्गानं केलेला सत्याग्रह आणि त्यांचं व्यक्तीमत्व आजच्या तरुण पिढीला कळावं यासाठी त्यांनी फिल्म तयार केली होती. Yoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम मित्र-मंडळींच्या आग्रहास्तव त्यांनी न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पाठवला होता. अन् पहिल्याच फेरीत चित्रपटाची प्रचंड स्तुती करण्यात आली. त्यानंतर एक-एक राऊंड पुढे जात चित्रपटानं विजेता पदावर आपलं नाव कोरलं. रमेश शर्मा यांनी हा पुरस्कार महात्मा गांधी यांना समर्पित केला. त्यांच्या कर्तृत्वामुळंच हा पुरस्कार स्विकारण्याची संधी त्यांना मिळाली असं ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात