मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Yoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन

Yoga Day 2021: ‘योगा करा फीट राहा’; ‘श्रीमंताघरची सून’ शिकवतेय वज्रासन

रुपल सध्या आपल्या चाहत्यांना योग साधना शिकवत आहे. याची सुरुवात तिनं वज्रासनापासून केली. (Vajrasana) तर मग अनन्यासोबत तुम्ही देखील सुरु करा योगसाधना

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 21 जून: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सकस आहारासोबतच व्यायाम आणि योगाची देखील गरज असते. शरीराला जर योगसाधनेची जोड मिळाली तर कित्येक शारीरिक व्याधींपासून तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवू शकता. अन् याच योग साधनेच महत्व समजावून सांगतेय अभिनेत्री रुपल नंद (Rupal Nand). श्रीमंता घरची सून (Shrimantaa Gharchi Sunn) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुपल सध्या आपल्या चाहत्यांना योग साधना शिकवत आहे. याची सुरुवात तिनं वज्रासनापासून केली. (Vajrasana) तर मग अनन्यासोबत तुम्ही देखील सुरु करा योगसाधना वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते म्हणून त्याला वज्रासन म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे जननेंद्रिय व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो. हे ध्यानासाठी योग्य आसन असून त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. गहना वशिष्टची जामिनावर सुटका; पॉर्न व्हिडीओ प्रकरणी झाली होती अटक
अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट वज्रासन करताना रुपल नंदनं सांगितलेल्या या सोप्या टीप्स करा फॉलो दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवावेत. डाव्या हातावर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा. उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे. आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घेऊन वरीलप्रमाणे कृती करून डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी. ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत. डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Yoga day

पुढील बातम्या