सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री जिममध्ये तासंतास व्यायाम करतात. परंतु आई झाल्यानंतर मात्र त्याचं आपल्या फिटनेसकडे फारसं लक्ष राहात नाही.
परंतु बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अशाही आहेत ज्या मुलं झाल्यानंतर तितक्यात फिट अँड फाईन आहेत. किंबहुना इतरांना व्यायाम, योग साधना करण्यासाठी सातत्यानं प्रेरणा देत असतात.
अनुष्का शर्मानं काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आता तिनं पुन्हा एकदा आपल्या फिटनेसकडे पुर्ण लक्ष वळवलं आहे.
शिल्पा शेट्टीला दोन मुलं आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती व्यायाम करतेय व इतरांना देखील त्यासाठी प्रेरणा देतेय.
मुलगी झाल्यानंतर ऐश्वर्या राय कमालीची जाड झाली होती. परंतु काही वर्षातच तिनं योग्य आहार आणि व्यायाम करुन आपलं वजन कमी केलं.
अभिनेत्री करिश्मा कपूर बर्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु, तिने तिच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही.
कश्मिरा शाह दोन मुलांची आई आहे. मात्र चाळीशी उलटून गेल्यानंतरही ती एखाद्या 25 वर्षांच्या तरुणीसारखी भासते. अनं याचं संपूर्ण श्रेय ती आपल्या व्यायामाला देते.