Home /News /entertainment /

'अग्गंबाई सासूबाई'मधील आसावरी- अभिजीत राजे पुन्हा एकत्र ; नवीन प्रोजक्टला केली सुरूवात

'अग्गंबाई सासूबाई'मधील आसावरी- अभिजीत राजे पुन्हा एकत्र ; नवीन प्रोजक्टला केली सुरूवात

‘अग्गंबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) मालिकेत अभिजीत राजे आणि आसावरीची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. चाहते मात्र या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

  मुंबई. 22 जानेवारी- छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai)  ही मालिका विशेष गाजली ती या मालिकेच्या विषयामुळे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी देखील मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरीच्या जोडीला प्रेक्षक आजही विसरू शकलेली नाही. आसावरीची भूमिका निवेदिता सराफ (Nivedita Saraf)  यांनी साकारली होती. तर अभिजीत राजे यांची भूमिका डॉ. गिरीश ओक  (Dr. Girish Oak)  यांनी साकारली होती. या दोघांची केमस्ट्रि प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही जोडी (Abhijeet Raje and Asavari reunited) पुन्हा एकत्र दिसणार आहे. अभिजीत राजे आणि आसावरीची जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याची माहिती एका पोर्टलने दिली आहे. या दोघांची जोडी एका जाहिरातीसाठी एकत्र येणार असल्याची माहिती या पोर्टलने दिली आहे. मात्र ही जाहिरात कोणती आहे याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. चाहत्यांना मात्र या जोडीला पुन्हा एकत्र पाहून आनंद होईल हे नक्की आहे. वाचा-'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत अपूर्वाची एन्ट्री! समोर आला दमदार LOOK मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन प्रोजेक्टला म्हणजे जाहिरातीचे चित्रीकरण सुरू झाले आहे. शिवाय ही जाहिरात लवकरच चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेनंतर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  या मालिकेचा विषय काहीसा वेगळा होता. मालिकेत सूनबाई आपल्य विधवा सासूबाईंचे लग्न करण्यासा पुढाकार घेतात. एवढेच नाही तर त्यांचे एका व्यक्तीसोबत लग्न देखील करून देते. सूनबाई म्हणजे शुभ्राच्या भूमिकेत मालिकेत तेजश्री प्रधान दिसली होती. शुभ्रा आणि आसावरीची जोडी चाहत्यांच्या आवडती होती. आजही चाहते या मालिकेला मिस करत असल्याचे दिसते. या मालिकेचा दुसरा भाग देखील आला मात्र त्याला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या