मुंबई, 10 मे: लॉकअप या कंगना रणौतच्या (Kangana Ranaut Show Lock Upp) चा पहिला विजेता मुनव्वर फारुकी ठरला आहे. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर तो ज्याठिकाणी राहतो त्या डोंगरी परिसरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. कॉमेडियनचे या प्रसंगादरम्यानचे काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. दरम्यान लॉकअपच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर मुनव्वर फारुकी आता प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी 12’ (Khatron Ke Khiladi 12) मध्ये दिसणार आहे, अशा चर्चा आहेत. कॉमेडियनने याविषयी भाष्य केले आहे मात्र त्याने पूर्णपणे याविषयी खुलासा केलेला नाही आहे. कॉमेडियन मुनव्वर फारुकीने या प्रश्नाविषयी उत्तर देताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘माहित नाही माझ्या टीमने बाहेर काय केलं आहे. मला याबाबत माहित नाही. मला असं वाटतं आहे की माझ्या आधी तुम्हाला याविषयी समजेल.’ Indian Express शी बोलताना त्याने याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने जरी तो शो चा भाग असणार आहे असे स्पष्टपणे सांगितले नसले तरी तो या शो चा भाग नसणार आहे असेही त्याने सांगितले नाही आहे. त्यामुळे अंदाज वर्तवला जातो आहे की मुनव्वर या शोमधील त्याच्या सहभागाविषयी अजूनही सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवू इच्छित आहे. हे वाचा- नेहा कक्करला होता हा गंभीर आजार, अँझायटीशी देखील केला सामना ‘ट्रॉफी तो डोंगरी ही आएगी’ लॉकअप या शोमधील मुनव्वर फारुकी हा सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक राहिला आहे. त्याने पायल रोहतगी या तगड्या स्पर्धकाला हरवत ही ट्रॉफी जिंकली आहे. तो वारंवार या शोमध्ये म्हणायचा की ‘ट्रॉफी तो डोंगरी ही आएगी’. सोशल मीडियावर देखील त्याच्या टीमने अशी पोस्ट केली होती. मुनव्वरने यावेळी 20 लाख रुपयांच्या प्राइस मनीसह इटली ट्रीप जिंकली आहे. शिवाय त्याला यावेळी एक लग्झरी कार देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. लॉकअपमधील कालावधीदरम्यान सर्वाधिक ट्रेंड होणारा स्पर्धक मुनव्वर ठरला होहात. दरम्यान ट्रॉफी डोंगरीमध्ये घेऊन आल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत झाले होते. आता तो पुन्हा एकदा नव्या शोमध्ये दिसणार का अशी चर्चा रंगली आहे.
कोण असणार ‘खतरों के खिलाडी’चे स्पर्धक ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलैक, चेतना पांडे, ‘बिग बॉस 15’ मधील स्पर्धक राजीव अदातिया हे या शोमधील स्पर्धक नक्की झाले आहेत. त्यांनी याबाबत पुष्टी केली आहे. दरम्यान मुनव्वरकडून अद्याप अशाप्रकारे कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.